KL Rahul Record : केएल राहुलची न्यू चंदीगडमध्ये वादळी खेळी! ८० चेंडूंत शतक अन् थेट धोनी-युवराजच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
KL Rahul Record : वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने नववे एकदिवसीय शतक झळकावलं. यासह युवी-माहीच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली.

IND vs WI 3rd ODI KL Rahul Smashes 129 Not Out 10000 International Runs Record : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) संकटमोचकाची भूमिका बजावत मैदानात तुफानी शतक झळकावले आहे. अवघ्या ८० चेंडूंत नववे शतक पूर्ण करत राहुलने भारताचा डाव सावरला आणि संघाला ३५१ धावांच्या विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले. या शतकी खेळीदरम्यान राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या १०,००० धावा पूर्ण करण्याचा मोठा टप्पाही गाठला आहे.
८७ चेंडूंत नाबाद १२९ धावा; एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या!
केएल राहुल ८७ चेंडूंत १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद १२९ धावा करून परतला. ही त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील आजवरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. भारतीय संघ १४१ धावांवर ३ बाद अशा नाजूक स्थितीत असताना तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. अखेरच्या षटकांत त्याने गुरनूर ब्रारसोबत आठव्या विकेटसाठी ६१ धावांची अभेद्य भागीदारी केली, ज्यात एकट्या राहुलने तुफानी फटकेबाजी केली.
८० चेंडूंत दुसरे सर्वात जलद शतक; २०२३ च्या आठवणी ताज्या!
𝐇𝐈𝐆𝐇𝐄𝐒𝐓 𝐒𝐂𝐎𝐑𝐄 𝐅𝐎𝐑 𝐊𝐋 𝐑𝐀𝐇𝐔𝐋 𝐈𝐍 𝐎𝐃𝐈𝐬 👏💯
Relive his knock ▶️ https://t.co/NTRvB5Z6HT#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @klrahul pic.twitter.com/x9L4V2coC5
— BCCI (@BCCI) October 3, 2026
राहुलचे हे ८० चेंडूंतील शतक त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. यापूर्वी २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरू येथे त्याने अवघ्या ६२ चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले होते. कठीण परिस्थितीत सुरुवातीला सावध आणि नंतर आक्रमक फलंदाजी करत त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची लय पूर्णपणे बिघडवून टाकली.
पाचव्या क्रमांकावर तिसरी सर्वोच्च खेळी; धोनी-युवराजच्या क्लबमध्ये एन्ट्री!
🔟K International Runs with a SIX ✅
💯 with a SIX ✅🎥 Milestones reached in MAXIMUM style, ft. @klrahul 🚀
Updates ▶️ https://t.co/PhSJSbvW7C#TeamIndia | #INDvWI | @mflone_ pic.twitter.com/JXFr6SNbfj
— BCCI (@BCCI) October 3, 2026
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या उभारणारा राहुल हा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुढे केवळ युवराज सिंग (१३९ धावा) आणि महेंद्रसिंग धोनी (१३४ धावा) हे दोनच दिग्गज आहेत. या क्रमांकावर १२९ धावांची खेळी करत राहुलने धोनीचा २००९ मधील १२४ धावांचा विक्रम मागे टाकला.
१०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा १५ वा भारतीय फलंदाज!
Smiles, cheers, and celebrations all around 🥳
🎥 Scenes to cherish for KL Rahul and #TeamIndia 🤩
Updates ▶️ https://t.co/PhSJSbvW7C#INDvWI | @mflone_ | @klrahul pic.twitter.com/wFTPDqLlvt
— BCCI (@BCCI) October 3, 2026
२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करणाऱ्या राहुलने २४३ सामन्यांच्या २८१ डावांमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. हा पराक्रम करणारा तो भारताचा १५ वा फलंदाज बनला आहे. त्याच्या नावावर तिन्ही फॉरमॅट मिळून २३ शतके नोंदवली गेली असून कसोटीत ४,२८८ तर टी-२० मध्ये २,२६५ धावा जमा आहेत.





