Ishan Kishan Sixes : इशान किशनने रचला षटकारांचा रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा केवळ तिसराच फलंदाज
Ishan Kishan Sixes : इशान किशनने षटकार मारण्याचा एक अनोखा विक्रम रचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात आपला पहिला षटकार मारून त्याने ही कामगिरी केली.

IND vs WI 2nd T20 Ishan Kishan 50 Sixes Calendar Year Joins Elite Club : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रांची येथील दुसऱ्या टी-२० सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) आणखी एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यात नाबाद ३७ धावा करून विराट कोहलीचा विक्रम मोडणाऱ्या इशानने या सामन्यात अवघ्या २२ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ४३ धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान पहिला षटकार ठोकताच त्याने २०२६ या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५० षटकारांचा टप्पा गाठत नवा इतिहास रचला.
फुल मेंबर देशांमधून केवळ तिसरा फलंदाज; एलिट क्लबमध्ये स्थान!
आयसीसीच्या पूर्ण सदस्य (Full Member) देशांमधून एका कॅलेंडर वर्षात ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-२० षटकार मारणारा इशान किशन हा जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर ४९ षटकार होते, तर रांचीत दोन षटकार खेचत त्याने यंदाच्या वर्षात आपल्या षटकारांची संख्या ५१ वर नेली आहे. एका वर्षात ५० हून अधिक टी-२० षटकार मारण्याचा पराक्रम पहिल्यांदा सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये (६८ षटकार) केला होता, जो आजतागायत विश्वविक्रम आहे. त्यानंतर अभिषेक शर्माने २०२५ मध्ये ५४ आणि यंदा २०२६ मध्ये तब्बल ६३ षटकार ठोकत दोनदा हा पराक्रम करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. आता ५१ षटकारांसह इशान किशनने या दिग्गजांच्या पंक्तीत आपले नाव कोरले आहे.
एका वर्षात सर्वाधिक T20I षटकार (फुल मेंबर संघ):
Solid partnership forming in the middle 🙌
Sanju Samson 🤝 Ishan Kishan
Updates ▶️ https://t.co/mZlyaWZsoe
#TeamIndia | #INDvWI | @mflone_ https://t.co/reZjJ4YOHH
— BCCI (@BCCI) October 9, 2026
- सूर्यकुमार यादव: ६८ षटकार (२०२२)
- अभिषेक शर्मा: ६३ षटकार (२०२६)
- अभिषेक शर्मा: ५४ षटकार (२०२५)
- इशान किशन: ५१ षटकार (२०२६)
षटकारांच्या दुनियेत टीम इंडियाचा जागतिक दबदबा!
विशेष म्हणजे या यादीतील अव्वल चारही नोंदी भारतीय फलंदाजांच्याच नावावर असून भारताचे वर्चस्व स्पष्ट दिसते. भारतीय संघाने २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल ३११ षटकार ठोकले आहेत; कोणत्याही इतर पूर्ण सदस्य देशाला एका वर्षात २५० षटकारांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. दर १०.९४ चेंडूंमागे एक षटकार मारण्याचे भारताचे गुणोत्तर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट प्रमाण ठरले आहे.





