IND vs SL T20 Series : श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री, दुश्मंत चमीरा ऐवजी मिळाली संधी…

IND vs SL T20 Series (Asitha Fernando) : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेने संघात बदल केले आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत असिथा फर्नांडोला संधी देण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज फर्नांडोने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 3 टी-20 सामनेही खेळले आहेत.
गेल्या महिन्यात श्रीलंका प्रीमियर लीगदरम्यान चमीराला दुखापत झाली होती. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. चमीराला दुखापत असूनही संघात स्थान मिळाले होते. पण सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. आता फर्नांडोला त्याची जागी संधी मिळाली आहे. फर्नांडो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे.
देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी….
फर्नांडोने श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळले आहेत. 2022 मध्ये त्याने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फर्नांडोने श्रीलंकेसाठी 3 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 2 बळी घेतले. 7 वनडे सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. फर्नांडोने 51 देशांतर्गत सामन्यात 58 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीतील एका सामन्यात 8 धावांत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
भारत-श्रीलंका टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक…
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील तीनही सामने पल्लेकेले येथे खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना 28 जुलै रोजी होणार आहे. तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये होणार आहेत.




