IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचे भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य, वॉशिंग्टन सुंदरचे सर्वाधिक तीन बळी…

Live Cricket Score Today, India vs Sri Lanka 2nd ODI 2024 : भारतीय संघ आज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा सामना करत आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना बरोबरीत सुटला होता, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 240 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मोहम्मद सिराजने मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या पथुम निसांकाला गोल्डन डकचा बळी बनवले. मात्र त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांच्यात 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण फर्नांडो आणि मेंडिस यांनी 5 धावांच्या अंतराने आपापल्या विकेट गमावल्या, त्यामुळे श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 3 विकेटवर 79 धावा झाली होती. मधल्या फळीत कर्णधार चारिथ असालंका आणि सदिरा समरविक्रमा आणि जेनिथ लियानागे यांनीही चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठा डाव खेळता आला नाही.
Innings Break!
A solid all-round bowling display from #TeamIndia! 👌 👌
3⃣ wickets for @Sundarwashi5
2⃣ wickets for @imkuldeep18
1⃣ wicket each for @akshar2026 & @mdsirajofficialStay tuned for our chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/KTwPVvU9s9#SLvIND pic.twitter.com/nOCQXYAnuT
— BCCI (@BCCI) August 4, 2024
एकवेळ श्रीलंकेने 136 धावसंख्येवर 6 विकेट गमावल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा खालच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाची धुरा संभाळली. खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रथम डुनिथ वेल्लालाघे आणि कामिंदू मेंडिस यांच्यात 72 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर, मेंडिस आणि अकिला धनंजय शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले, ज्यांनी एकत्रितपणे श्रीलंकेला ऑलआऊट होण्यापासून वाचवले नाही तर 30 महत्त्वपूर्ण धावाही जोडल्या.
पहिली विकेट लवकर पडल्यानंतर यजमान श्रीलंकेने चांगले पुनरागमन केले, मात्र मधल्या षटकांमध्ये सातत्याने विकेट पडल्यामुळे संघाला 250 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक धावा केल्या, ज्याने 62 चेंडूत 40 धावा केल्या. दुनिथ वेल्लालाघेने पुन्हा एकदा जबाबदार खेळी करत 35 चेंडूत 39 धावा केल्या, तर कामिंदू मेंडिसनेही 40 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्णधार चरिथ असलंका 42 चेंडूत 25 धावांची खेळी केली तर अकीला धनंजय याने 15 धावांचे योगदान दिले.
भारताच्या गोलंदाजीवर नजर टाकली तर वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक विकेट घेतल्या. सुंदरने 10 षटकात केवळ 30 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. कुलदीप यादवनेही घातक गोलंदाजी करत 10 षटकात 33 धावांत 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.





