IND vs SL : रनआऊट असूनही कामिंदू मेंडिसला OUT का दिलं नाही? काय आहे ICC चा नियम? जाणून घ्या

IND vs SL Kamindu Mendis run out controversy : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना या हंगामातील सर्वात रोमांचक ठरला. या सामन्याने प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या ह्रदयाचे ठोके वाढवले होते. विशेषतः सुपर ओव्हरमधील एका आयसीसी नियमाने सर्वांचे लक्ष वेधले, ज्यामुळे श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला. या नियमाची माहिती भारतीय खेळाडूंनाही नव्हती, पण शनाकाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला.
सुपर ओव्हरमधील रनआऊटचा गोंघळ –
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या डावादरम्यान अर्शदीप सिंगने चौथ्या चेंडूवर दासुन शनाकाला चकवले. यानंतर शनाकाने धाव घेण्यासाठी पळायला सुरुवात केली, पण यष्टीरक्षक संजू सॅमसनने थेट थ्रो मारून कामिंदु मेंडिसला धावचीत केले. लेग अंपायरने मेंडिसला बाद ठरवले आणि सर्वांना वाटले की श्रीलंकेचा डाव संपला. पण याचवेळी एक अनपेक्षित ट्विस्ट समोर आला.
That. Was. One. Crazy. Game. Of. Cricket 🥵#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 #INDvSL pic.twitter.com/XSrcmEBsy4
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 26, 2025
अर्शदीपने शनाकाच्या कॉट बिहाइंडसाठी अपील केली होती, त्यामुळे अंपायरने त्याला बाद ठरवले. पण शनाकाने डीआरएस घेतला, आणि तिसऱ्या अंपायरच्या रिप्लेतून कळले की चेंडू बॅटला लागलाच नव्हता. त्यामुळे शनाका नाबाद ठरला. पण येथे पेच निर्माण झाला. शनाका नाबाद होता, पण सॅमसनने मेंडिसला रनआऊट केले होते. यावर आयसीसीचा नियम काय सांगतो? जाणून घेऊया.
हेही वाचा – IND vs SL : महिश तीक्ष्णाची कमाल! आपल्याच गोलंदाजीवर हवेत झेप घेत पकडला गिलचा अप्रतिम कॅच, पाहा VIDEO
आयसीसी नियम आणि वाद –
आयसीसीच्या नियम 20.1.1.3 नुसार, एकदा फलंदाजाला बाद ठरवले की तो चेंडू तात्काळ डेड (मृत) मानला जातो. अंपायरने शनाकाला कॉट बिहाइंड बाद ठरवले, तेव्हा चेंडू डेड झाला होता. त्यामुळे त्यानंतर सॅमसनने केलेले धावचीत अवैध ठरले. शनाकाने या नियमाचा चतुराईने फायदा घेत स्वतःला वाचवले. हा निर्णय भले वादग्रस्त वाटला, तरी तो एमसीसीच्या क्रिकेट नियमांवर आधारित आहे. नियमांनुसार, एकदा फलंदाज बाद ठरला की, त्या चेंडूवर पुढे कोणताही फलंदाज आउट दिला जाऊ शकत नाही, मग डीआरएसने निर्णय बदलला तरीही.
हेही वाचा – IND vs SL : टीम इंडियाने ठोकला विजयाचा षटकार! श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये केले चारीमुंड्या चीत
सामन्याचा निकाल –
या वादग्रस्त प्रसंगानंतरही शनाका श्रीलंकेला विजय मिळवून देऊ शकला नाही. अर्शदीप सिंगच्या पाचव्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यामुळे श्रीलंकेने भारतासमोर सुपर ओव्हरमध्ये 3 धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूत 3 धावा घेत पूर्ण केले. अशा प्रकारे भारताने या रोमांचक सामन्यात बाजी मारली.





