IND vs SA : अर्शदीप सिंगचा मोठा धमाका! भुवनेश्वरला मागे टाकत मलिंगाचा मोडला खास विक्रम

Arshdeep Singh broke Bhuvneshwar and Maling Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील तिसरा धर्मशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ११७ धावांत गारद केले. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेत दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. या दरम्यान त्याने भुवनेश्वर कुमार आणि लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला.
अर्शदीपने मोडला भुवनेश्वरचा विक्रम –
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अर्शदीपने पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्सला बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमला बाद त्याने एक खास पराक्रम केला. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा भुवनेश्वर कुमारचा (४७) विक्रम मोडला.अर्शदीप सिंगने आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत.
First over 🤝 First wicket
Fantastic review by #TeamIndia 👌
Arshdeep Singh with the wicket ☝️
Updates ▶️ https://t.co/AJZYgMA9ms#INDvSA | @IDFCFIRSTBank | @arshdeepsinghh pic.twitter.com/9NRAIauXYJ
— BCCI (@BCCI) December 14, 2025
मलिंगाचा जागतिक विक्रम मोडला –
अर्शदीपच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला सामन्याच्या सुरुवातीलाच मजबूत पकड मिळाली. त्याचबरोबरच जागतिक स्तरावरही एक मोठा टप्पा पार केला. त्याने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला आहे. मलिंगाने ८४ सामन्यांत १०७ विकेट्स घेतल्या होत्या, तर अर्शदीपने केवळ ७१ सामन्यांत १०८ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा – IND vs SA : हार्दिक पंड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! असा ‘डबल’ धमाका करणारा जगातील पहिलाच खेळाडू
वरुण चक्रवर्तीने पूर्ण केले अर्धशतक –
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने फक्त ३२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेतल्या. त्याने अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना मागे टाकले, ज्यांनी ३३ सामन्यांमध्ये हा विक्रम केला. चक्रवर्ती आता फक्त ३० सामन्यांमध्ये हा विक्रम करणाऱ्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या मागे आहे. हे चक्रवर्तीचे सातत्यपूर्ण कामगिरी आणि विकेट घेण्याची क्षमता दर्शवते.





