IND vs SA : हार्दिक पंड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! असा ‘डबल’ धमाका करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Hardik Pandya 100 T20I wickets Complete : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने एक मोठा इतिहास रचला आहे. त्याने ट्रिस्टन स्टब्सला बाद करताच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे तो हा पराक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या हार्दिक पांड्याने याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला जमला नसलेला हा दुर्मिळ ‘डबल धमाका’ केला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा आणि १०० विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
हार्दिक पंंड्याने रचला इतिहास –
Milestone Moment!
That moment when Hardik Pandya became only the third #TeamIndia cricketer (in Men’s cricket) to scalp 100 T20I wickets 👏👏
Updates ▶️ https://t.co/AJZYgMAHc0#INDvSA | @hardikpandya7 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XYDxMvrEPz
— BCCI (@BCCI) December 14, 2025
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या हा मॅच विनर खेळाडू मानला जातो, जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपला प्रभाव दाखवतो. १०० विकेट्स आणि १०० षटकारांचा हा डबल धमाका करणारा हार्दिक पांड्या हा जगातील फक्त चौथा खेळाडू ठरला आहे.
हार्दिक पंंड्या जगातील पहिलाच खेळाडू –
💯 and COUNTING 👌
Congratulations to Hardik Pandya on completing 1⃣0⃣0⃣ T20I wickets 👏👏
Updates ▶️ https://t.co/AJZYgMAHc0#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/i1c0GdYUiy
— BCCI (@BCCI) December 14, 2025
हार्दिक पंड्याच्या आधी शाकिब अल हसन (बांगलादेश), मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) या खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हा विक्रम करणारा हार्दिक हा पहिला खेळाडू आहे. याशिवाय, हार्दिक पंड्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त ६१ धावा दूर आहे, जो आणखी एक महत्त्वाचा टप्पा असेल.
बुमराह-अर्शदीपच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा हार्दिक पंड्या हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी जसप्रीत बुमराह (११५ विकेट्स) आणि अर्शदीप सिंग (१०३ विकेट्स) यांनी हा पराक्रम केला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १०० विकेट्स घेणारा तो ३४ वा गोलंदाज ठरला आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी हार्दिक पंड्याचा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये फॉर्ममध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण २०२४ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला, तेव्हा त्याने दोन्ही आघाड्यांवर मॅच विनरची भूमिका बजावली होती. त्याच्या या विक्रमामुळे विश्वचषकापूर्वी संघात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.





