IND vs SA 1st ODI : राहुलच्या नेतृत्वाची परीक्षा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज पहिला वनडे सामना…

India vs South Africa 1st ODI (Johannesburg, South Africa) – विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी गेल्या दीड दशकात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे, परंतु आता त्यांची कारकीर्द संपुष्टात येत आहे आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
ठिकाणः वंडरर्स, सँडस्टोन
वेळः दुपारी १.३० वा.पासून
थेट प्रक्षेपणः स्टार स्पोर्टस
या परिस्थितीत, तीन सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करणार्या के.एल. राहुलवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याने याआधी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, पण या मालिकेत यश मिळाल्यास त्याला दीर्घ कालावधीसाठी एकदिवसीय संघाची कमान दिली जाऊ शकते. त्यामुळे त्याच्यासाठी ही मालिका एक परीक्षाच असणार आहे.
आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या यंग टिम इंडिया ब्रिगेडने नुकतीच झालेली टी-20 मालिका 1-1अशी बरोबरीत सोडविली आहे. त्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर होणाऱ्या पहिल्याच वनडे मालिकेत भारत इतिहास मागे सोडून चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.
यासामन्यात साई सुदर्शनल ऋतुराजसोबत सलामीची संधी मिळू शकते. तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. श्रेयस अय्यर चौथ्या आणि कर्णधार के.एल राहुल पाचव्या स्थानावर खेळेल. फिनिशर रिंकू सिंगला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. रिंकू सिंगने यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. संघ व्यवस्थापन त्याला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्येही आजमावू इच्छित आहे.
शमी-चहरची माघार
वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच भारताच्या महंम्मद शमी व दिपक चहर या दोन खेळाडूंनी आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. दीपक एकदिवसीय संघाचा तर शमी हा कसोटी संघाचा भाग होता. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात शमीने शानदार गोलंदाजीसह सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. यानंतर तो जखमी झाल्याने त्याला वनडेतून विश्रांती देण्यात आली होती. मात्रा आता तंदूरूस्त नसल्याने त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले आहे. तर चहरने कौटुंबिक कारणामुळे या दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले आहे.
आकाश दीपला वनडेत स्थान
दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून नाव मागे घेतल्यानंतर निवड समितीने त्याच्या जागी आकाश दीपला संघात स्थान दिले आहे. बंगालचा आकाश आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. मात्र, बीसीसीआयने शमीच्या बदली खेळाडूबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. याशिवाय राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस महाम्ब्रे हे वनडे मालिकेत संघासोबत नसतील, असे बीसीसीआयने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. त्यांच्या जागी सितांशु कोटक (फलंदाजी प्रशिक्षक), राजीव दत्त (गोलंदाजी प्रशिक्षक), अजय रात्रा (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे काम पाहातील.
INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…
संभाव्य संघः
भारत : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेझ वॅन डीसी, रास डुसेन, काइल व्हेरिन आणि लिझाद विल्यम्स.





