IND vs PAK : आऊट की नॉआऊट? संजू सॅमसनने घेतलेल्या कॅचने पेटला वाद, फखर झमानही चकित, पाहा VIDEO

IND vs PAK Sanju Samson Controversial Catch : आशिया कप २०२५च्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान अवघ्या १४ धावांवर बाद झाला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने त्याला स्लोअर चेंडूवर फसवत विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती झेलबाद केले. मात्र, बाद झाल्यानंतर फखर झमान नाराज दिसला, कारण त्याला तिसऱ्या पंचाचा निर्णय मान्य नव्हता.
चेंडूने फखरच्या बॅटचा बाह्य किनारा घेतला आणि संजू सॅमसनने जमिनीलगतचा चेंडू अचूक झेलला. मैदानी पंचांनी झेल क्लीन आहे की नाही हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तिसऱ्या पंचाने निर्णय देताच फखर झमान चकित झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिसऱ्या पंचाच्या निर्णयाने फखर झमान चकित –
Wickets ka 𝐇𝐀𝐑𝐃𝐈𝐊 swaagat, yet again 🤩
Hardik Pandya nicks one off Fakhar Zaman 🔥
Watch #INDvPAK LIVE NOW, on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/19fR5GiMn3
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 21, 2025
तिसऱ्या पंचाने संजू सॅमसनच्या झेलची पडताळणी केली असता, चेंडू थेट त्याच्या ग्लोव्हजमध्ये गेल्याचे आढळले आणि फखरला बाद ठरवण्यात आले. मात्र, हा निर्णय येताच फखरने मैदानावर पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला वाटले की चेंडू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये जाण्यापूर्वी जमिनीला लागला होता, परंतु रीप्लेमध्ये तसे काही दिसले नाही. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही फखरने आपले मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्याकडे याबाबत तक्रार केली, पण प्रशिक्षक निर्णयावर समाधानी दिसले.
हेही वाचा – ‘हात मिळवण्यात काहीच गैर नाही…’, IND vs PAK हस्तांदोलन वादावर मोहम्मद अझरुद्दीनचे मोठं वक्तव्य
झेलवरून सोशल मीडियावर वाद –
Fakhar Zaman wrongfully given out, nothing new in a India Pakistan game ☹️ pic.twitter.com/iPa9uMWS7G
— PCT Replays 2.0 (@ReplaysPCT) September 21, 2025
Bhartiii Pakistani Foujiyo se Kes qadar khoof zada ha 😂😂😂. #FakharZaman #PAKvIND #INDvPAK pic.twitter.com/HgGaQrJKFj
— Saba Nureen (@sabanureen_) September 21, 2025
फखर झमानच्या झेलावरून सोशल मीडियावर जोरदार वाद निर्माण झाला. पाकिस्तानी चाहत्यांनी हा झेल अवैध असल्याचा दावा केला. काही चाहत्यांनी तर पंच भारताचा पक्ष घेत असल्याचा आरोप केला. मात्र, रीप्लेमध्ये फखरचा झेल पूर्णपणे वैध असल्याचे स्पष्ट झाले. संजू सॅमसनने शानदार झेल घेतला, पण भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये दोन झेल सोडले. अभिषेक शर्माने थर्ड मॅन क्षेत्रात पहिला झेल टाकला, तर कुलदीप यादवने फाइन लेगवर दुसरा झेल सोडला.
हेही वाचा – IND vs PAK : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय! बुमराह-वरुणचे पुनरागमन, पाहा प्लेइंग इलेव्हन
फखर झमानच्या झेलाने सामन्यात नाट्य निर्माण केले, पण संजू सॅमसनच्या अचूक झेल आणि हार्दिक पंड्याच्या चतुर गोलंदाजीमुळे भारताला महत्त्वाची विकेट मिळाली. तरीही, या निर्णयावरून वाद कायम आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर 14 षटकानंतर पाकिस्तानने ३ बाद ११० धावा केल्या आहेत. फरहान ५८ आणि तलत १० धावांवर खेळत आहे. भारताकडून हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली आहे.





