IND vs PAK : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय! बुमराह-वरुणचे पुनरागमन, पाहा प्लेइंग इलेव्हन

IND vs PAK Super Four Match Updates : आशिया कप २०२५ मधील ‘सुपर फोर’ फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकू प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन आणि पाकिस्तानने दोन बदल केले आहेत.
भारतीय संघात हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती परतले आहेत. पाकिस्तान संघात हसन नवाज आणि खुशदिल शाह या सामन्यात खेळत नाहीत. यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. गट टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सनी एकतर्फी पराभव केला होता.
India won the toss and chose to bowl first 💪🔥#indvspak #bharatarmy #asiacup #coti🇮🇳 pic.twitter.com/mL9hCPCACB
— The Bharat Army (@thebharatarmy) September 21, 2025
आशिया कपमधील भारत-पाक हेड टू हेड रेकॉर्ड –
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास हा भारताच्या वर्चस्वाची गाथा सांगतो. एकूण २० सामन्यांपैकी भारताने ११ सामने जिंकले, तर पाकिस्तानने ६. वनडे फॉरमॅटमध्ये भारत ८-५ ने आघाडीवर आहे, तर टी-२० मध्ये ४ सामन्यांपैकी भारताने ३ जिंकले. आशिया कपच्या ट्रॉफीवरही भारताचे नाव सर्वाधिक ८ वेळा कोरले गेले, तर पाकिस्तानने २००० आणि २०१२ मध्ये दोनदा ही स्पर्धा जिंकली.
भारत-पाक दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद





