IND vs PAK : ‘मर्द आहे तर…’, शाहिद आफ्रिदीचे इरफान पठानला चॅलेंज, भारत-पाक वादावर अश्विनने दिले चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO

IND vs PAK Irfan Pathan reply on Shahid Afridi : आशिया कप 2025 च्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील लढाईला आता मैदानाबाहेरील वादविवादने नवे वळण मिळाले आहे. दोन्ही देशांचे माजी खेळाडू एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानला थेट आव्हान दिले आहे. यावर इरफान पठाननेही सडेतोड प्रत्युत्तर दिले, तर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही यावर स्पष्ट मत मांडले आहे.
शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य –
पाकिस्तानच्या एका टीव्ही शोमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदीने इरफान पठानवर निशाणा साधला. तो म्हणाला, “मी त्याला मर्द मानतो जो समोरासमोर बोलतो, डोळ्यात डोळे घालून बोलतो. पाठीमागे बोलण्यात काय अर्थ आहे? इरफान पठान आयुष्यभर हे सिद्ध करत राहील की तो सर्वात मोठा भारतीय आहे.” आफ्रिदीच्या या वक्तव्यातून त्याने इरफानच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसते.
Shahid Afridi accused @IrfanPathan of telling lies and challenged him to a face-to-face discussion. Afridi also claimed Pathan is attempting to prove his loyalty to India while opposing Pakistan.
Who is gonna tell @SAfridiOfficial that Pathan doesn’t need to prove anything, as… pic.twitter.com/3ViPYMve43
— Slogger (@kirikraja) September 19, 2025
इरफान पठानचे प्रत्युत्तर –
Aap Log sahi kehte hain: ‘Ye padosi X players aur media Irfan Pathan ke naam se obsessed hain.’
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 20, 2025
शाहिद आफ्रिदीच्या या टीकेला इरफान पठानने सोशल मीडियावरून सणसणीत प्रत्युत्तर दिले. त्याने आफ्रिदीचे नाव न घेता लिहिले, “तुम्ही बरोबर म्हणता. हे शेजारील माजी क्रिकेटपटू आणि माध्यमे इरफान पठानच्या नावाने काही जास्तच झपाटलेले दिसतात.” इरफानच्या या प्रत्युत्तराने वाद आणखी तीव्र झाला आहे.
हेही वाचा – INDW vs AUSW : भारतीय संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
अश्विन काय म्हणाला?
🚨Ravichandran Ashwin’s bruttal response to Shahid Afridi & Yousuf Yohana!!
– Ash bhai used reference of a quote, “Never wrestle with a pig because you’ll both get dirty & the pig likes it”.
Ovbiously Ashwin is a class when he speaks that is why he didn’t use P__ term❤️. pic.twitter.com/Lgl9s7lCu5
— Rajiv (@Rajiv1841) September 21, 2025
या वादावर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही आपले मत स्पष्टपणे मांडले. त्याने आफ्रिदीचे नाव न घेता त्याच्यावर जोरदार टीका केली. अश्विन म्हणाला, “त्यांची विचारसरणी खूपच खालच्या स्तराची आहे. ते आपल्या पातळीपर्यंत विचार करू शकत नाहीत. आपण त्यांच्या स्तरावर उतरलो तर ती आपली हार ठरेल. आणि हेच त्यांना हवे आहे.” अश्विनने यातून मैदानाबाहेरील वादात न पडण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा – SL vs BAN : तौहीद-सैफच्या जोरावर बांगलादेशचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सुपर-4 मध्ये धमाकेदार सुरुवात!
आशिया कप 2025 चा थरार –
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचकारी असतात. आशिया कप 2025 मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच माजी खेळाडूंमधील या शाब्दिक चकमकीने सामन्याचा थरार वाढवला आहे. मैदानावरील लढाईबरोबरच मैदानाबाहेरील ही वादही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या सर्व घडामोडींमुळे आशिया कप 2025 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता चाहते केवळ मैदानावरील खेळच नव्हे, तर या वादांचे पडसाद कसे उमटतात याकडेही लक्ष ठेवून आहेत.





