IND vs PAK : भारताचा अजिंक्यरथ सुसाट! अभिषेक-शुबमनच्या धमाक्याने पाकिस्तानची उडाली दाणादाण

IND vs PAK India beat Pakistan : आशिया चषक 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु भारताने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हे लक्ष्य 18.5 षटकांत सहज गाठले. अभिषेक शर्माने 39 चेंडूंमध्ये 74 धावांची खणखणीत खेळी करत 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले, तर शुबमन गिलने 28 चेंडूंमध्ये 47 धावांची शानदार खेळी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी रचली.
अभिषेक-शुबमनने जिंकली मनं –
पाकिस्तानने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात केली. अभिषेक आणि शुबमन यांनी पहिल्या 6 षटकांत 69 धावा जोडल्या. अवघ्या 4.4 षटकांत या जोडीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण करत आपले इरादे स्पष्ट केले. अभिषेकने सुरुवातीला संयमी खेळ केला, परंतु 24 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक ठोकले. गिलने आपल्या शैलीने प्रभावित केले, तर अभिषेकने आक्रमक फटकेबाजी करत 52 चेंडूंमध्ये भारताचा डाव 100 धावांपर्यंत नेला.
For his aggressive half-century in the chase, Abhishek Sharma wins the Player of the Match 🔥#TeamIndia kickstart the #Super4 stage with a resounding win ✅
Scoreboard ▶️ https://t.co/CNzDX2HKll#AsiaCup2025 pic.twitter.com/GuKoAdAoGI
— BCCI (@BCCI) September 21, 2025
दहाव्या षटकात शुबमन गिल (47) फहीम अशरफच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खाते न उघडता माघारी परतला. अभिषेक शर्माकडून शतकाची अपेक्षा होती, परंतु तो 74 धावांवर अबरार अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी संयमी खेळी करत भारताला विजयापर्यंत नेले.
भारतीय गोलंदाजांनी केले जबरदस्त कमबॅक –
𝗔 𝗰𝗹𝗶𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝘄𝗶𝗻 𝗶𝗻 𝘁𝗵𝗲 𝗯𝗮𝗴 𝗶𝗻 #𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝟰! 🙌#TeamIndia continue their winning run in the #AsiaCup2025! 👏 👏
Scoreboard ▶️ https://t.co/CNzDX2HKll pic.twitter.com/mdQrfgFdRS
— BCCI (@BCCI) September 21, 2025
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावा केल्या, परंतु एकवेळ त्यांचा डाव 200 धावांपर्यंत जाण्याची शक्यता होती. पहिल्या 10 षटकांत पाकिस्तानने 1 बाद 91 धावा केल्या होत्या. मात्र, मधल्या 7 षटकांत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना रोखले. साहिबजादा फरहानने 58 धावा केल्या, परंतु मोहम्मद नवाझ (21 चेंडूंमध्ये 19) आणि हुसैन तलत (11 चेंडूंमध्ये 10) यांच्या संथ खेळीमुळे पाकिस्तानचा नेट रनरेट घसरला.
हेही वाचा – IND vs PAK : दोन जीवनदान, अर्धशतक, अन् फायरिंग सेलिब्रेशन साहिबजादाला शिवमने दाखवला तंबूचा रस्ता! पाहा VIDEO
शेवटच्या दोन षटकांत फहीम अशरफने नाबाद 20 धावांची खेळी करत पाकिस्तानला 171 धावांपर्यंत पोहोचवले. भारतासाठी शिवम दुबेने 2 बळी घेतले, तर कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 45 धावा दिल्या. तरीही, भारताने सामना सहज जिंकला. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर सुपर फोर मध्ये दणदणीत विजय मिळवला. आता भारतीय संघ सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकले आहे.





