Jiten Ramanandi : कोण आहे जितेन रामानंदी?ज्याने एकाच षटकात अभिषेक-हार्दिला दाखवला तंबूचा रस्ता

अभिषेक शर्माला केले झेलबाद –
भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आक्रमक खेळी करत 15 चेंडूंमध्ये 38 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, जितेन रामानंदीने त्याला 142 किमी. प्रतितास वेगाने टाकलेल्या चेंडूवर बाद केले. या वेगवान चेंडूने अभिषेकला चकवत त्याला झेलबाद केले आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला.
For India in 2025 T20Is
As an opener:
Abhishek Sharma – 221 SR
Others – 120.9 SR#indvsuae #Abhisheksharma pic.twitter.com/qVzHmONvPE— Cricket Stats (@43atAhemdabad) September 19, 2025
हार्दिक पंड्याला केले रनआऊट –
i will not say anything on that😭#AsiaCup2025 #IndvsOmn #hardikpandaya https://t.co/5FfDmV2c0S pic.twitter.com/rpEiBR6QCm
— rishi (@HeliHitter) September 19, 2025
जितेन रामानंदीने हार्दिक पंड्याला रनआउट करत आणखी एक मोठा धक्का दिला. संजू सॅमसनने खेळलेल्या स्ट्रेट ड्राइव्ह चेंडूवर जितेनच्या बोटांना स्पर्श होऊन चेंडू थेट स्टम्पवर आदळला. यावेळी हार्दिक पंड्या क्रीजच्या बाहेर होता आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अवघ्या तीन चेंडूंमध्ये भारताच्या दोन मोठ्या सिक्सर हिटर फलंदाजांना बाद करत जितेनने सामन्यावर आपली छाप सोडली.
हेही वाचा – IND vs OMA : भारताने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील दुसरा संघ
यानंतर रामानंदीने अर्शदीप सिंगला रनआऊट करत भारताला आठवा धक्का दिला. हर्षितने सरळ शॉट खेळला जो रामानंदीच्या हाताला लागल्यावर स्टंपवर आदळला, त्यादरम्यान अर्शदीप क्रीजबाहेर होता. ज्यामुळे फक्त एक धाव करुन माघारी जावे लागले. जितेन रामानंदीच्या या शानदार कामगिरीने ओमानने भारताला कडवी टक्कर दिली असली, तरी भारतीय संघाने 8 गडी गमावून १८९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
रामानंदी आणि पंड्या यांच्यात खास नाते –
जितेन रामानंदीचा जन्म गुजरातमधील बडोद्यात झाला असून, त्याने हार्दिक पंड्यासोबत स्थानिक इंटर-क्लब स्पर्धांमध्ये एकत्र क्रिकेट खेळले आहे. भारतात करिअर घडवण्यात अपयशी ठरल्यानंतर जितेन ओमानला गेला आणि तिथे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज त्याच हार्दिक पंड्याविरुद्ध आणि भारताविरुद्ध त्याने आपली प्रतिभा दाखवली.
हेही वाचा – IND vs OMA : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल
जितेन रामानंदीचे क्रिकेट कारकीर्द –
जितेन रामानंदीने याच वर्षी टी20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने अमेरिकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 4 टी20 सामन्यांमध्ये 3 बळी घेतले असून, त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 7.17 आहे, जो त्याच्या गोलंदाजीतील नियंत्रण दर्शवतो.





