IND vs OMA : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल

IND vs OMA India elects to bat first : आशिया कप 2025 स्पर्धेतील गट टप्प्यातील शेवटचा १२ वा सामना अबुधाबी येथे होत आहे. या सामन्यात भारत आणि ओमान आमनेसामने आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केल्याची घोषणा केली.
वरुण चक्रवर्तीच्या जागी हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराहच्या जागी अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आला आहे.
भारताने या सामन्यासाठी दोन स्पेशालिस्ट स्पिनर्स आणि दोन स्पेशालिस्ट गोलंदाजांना मैदानात उतरवले आहे. त्याचबरोबर ओमान संघानेही आपल्या प्लेइंग इलेव्हन दोन बदल केले आहेत.भारतीय संघ सुपर-4 मध्ये आधीच पात्र ठरला आहे आणि रविवारी होणाऱ्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ओमानविरुद्ध त्यांच्या फलंदाजांना संधी देण्याची ही सुवर्णसंधी आहे.
महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ओमानविरुद्ध सरावाची उत्तम संधी –
#INDvsOMAN: India captain Suryakumar Yadav won toss. Harshit Rana and Arshdeep Singh replacing Jasprit Bumrah and Varun Chakaravarthy#AsiaCup2025 pic.twitter.com/oIaOQJ5fVK
— TrendHubX (@TrendHubX) September 19, 2025
अभिषेक शर्माने अपेक्षेप्रमाणे दमदार सुरुवात केली आहे, परंतु शुबमन गिलला क्रीजवर थोडा वेळ हवा आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली, परंतु तिलक वर्मा यांना फलंदाजीसाठी आणखी काही वेळ मिळावा अशी त्याची इच्छा आहे. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांना सात दिवसांत चार सामने खेळावे लागतील आणि हे लक्षात घेता, संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनाही काही फलंदाजीच्या संधी देऊ इच्छित असेल.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
ओमान (प्लेइंग इलेव्हन): आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), शाह फैसल, झिकारिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी.





