IND vs OMA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

Arshdeep Singh Makes T20I History in IND vs OMA : 19 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय संघाचा डावखुरा जलद गोलंदाज अर्शदीप सिंगने आशिया कप 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध एक विकेट घेत इतिहास रचला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यासह, त्याने जलद गोलंदाजांमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रमही आपल्या नावावर केला. अर्शदीपने हा पराक्रम केवळ 64 डावांमध्ये साध्य करत बहरीनच्या रिजबान बट याचा 66 सामन्यांचा विक्रम मोडला.
ऐतिहासिक क्षण –
अर्शदीप सिंगने ओमानविरुद्धच्या सामन्यात 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विनायक शुक्लाला बाद करत हा मैलाचा दगड गाठला. रिंकू सिंगने विनायकचा झेल टिपला. या विकेटसह अर्शदीप टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी राशिद खान आणि वानिंदु हसरंगा यांनी कमी डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
Arshdeep Singh crosses 100 wickets, claiming the top spot for India in T20Is. 🎯💥#INDvOMAN #ArshdeepSingh #Sportskeeda pic.twitter.com/bdDNqXMCof
— Sportskeeda (@Sportskeeda) September 19, 2025
टी-20 मध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज:
- अर्शदीप सिंग (भारत) – सामने 64*
- रिझवान बट (बहरीन) – सामने 66
- हारिस रौफ (पाकिस्तान) – सामने 71
- मार्क अडायर (आयर्लंड) – सामने 72
- बिलाल खान (ओमान) – सामने 72
हेही वाचा – INDW vs AUSW : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने गुलाबी जर्सी का परिधान केली? जाणून घ्या
भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स –
अर्शदीपने 64 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेत भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला. त्याने युझवेंद्र चहल (96 विकेट्स), हार्दिक पंड्या (96* विकेट्स), जसप्रीत बुमराह (92 विकेट्स) आणि भुवनेश्वर कुमार (90 विकेट्स) यांना मागे टाकले. अर्शदीपचा सर्वोत्तम प्रदर्शन 4/9 असा आहे, जो भारतीय टी-20 इतिहासातील एक उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.
भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट्स –
- अर्शदीप सिंग – 64 सामने – 100* विकेट्स
- युझवेंद्र चहल – 80 सामने – 96 विकेट्स
- हार्दिक पंड्या – 117 सामने – 96* विकेट्स
- जसप्रीत बुमराह – 72 सामने – 92 विकेट्स
- भुवनेश्वर कुमार – 87 सामने – 90 विकेट्स
हेही वाचा – IND vs OMA : सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचा निसटता विजय, ओमानच्या कलीम-मिर्झाच्या खेळीने वेधलं लक्ष
अर्शदीप सिंगच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटच्या टी-20 इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. त्याची ही कामगिरी भारतीय गोलंदाजीच्या सामर्थ्याचे आणि त्याच्या कौशल्याचे द्योतक आहे.





