IND vs NZ : टीम इंडियाच ‘चॅम्पियन्स’ ! पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी केलं टीम इंडियाचं अभिनंदन

IND vs NZ India Won the Champions Trophy for the 3rd Time : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने १२ वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले.
भारताने सातव्यांदा आयसीसी ट्रॉफीवर कोरलं नाव :
ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले.
भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम खेळाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले असून, संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
भारतीय संघाच्या या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी ट्विट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
गृहमंत्री अमित शहा :
A victory that scripts history.
Congratulations to Team India on clinching a stunning victory in the ICC #ChampionsTrophy2025. Your fiery energy and unassailable dominance on the pitch made the nation proud, setting a new benchmark for cricketing excellence.
May you always come… pic.twitter.com/SC22G8c3OF
— Amit Shah (@AmitShah) March 9, 2025
इतिहास रचणारा विजय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी२०२५ मध्ये शानदार विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. तुमच्या उत्तुंग उर्जेने आणि मैदानावरील अजिंक्य वर्चस्वाने देशाला अभिमान दिला, क्रिकेटमधील उत्कृष्टतेसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
किती रोमांचक सामना! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडवर मेन इन ब्लूचा ऐतिहासिक विजय! २००२, २०१३ मध्ये तीनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव संघ म्हणून मेन इन ब्लू उंच उभा आहे आणि आता, १२ वर्षांनंतर, पुन्हा एकदा हा मुकुट आपल्या नावावर आहे!
History created, dreams fulfilled! 🇮🇳
Champions of the Champions Trophy! 🏏🏆What a thrilling match! 💙 A historic triumph for the Men in Blue over New Zealand in the ICC Champions Trophy! The Men in Blue stand tall as the only team to win the ICC Champions Trophy thrice—2002,… pic.twitter.com/hJzoEFu32R
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2025
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने आपल्या हुशारीने आघाडीवर नेतृत्व केले. गोलंदाजांनीही या प्रसंगी उल्लेखनीय कौशल्य आणि अचूकता दाखवत चांगली कामगिरी केली. हा संपूर्ण सांघिक प्रयत्न होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी :
टीम इंडियाने अंतिम सामना जिंकताच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत संपूर्ण देशाचे अभिनंदन केले आणि टीम इंडियाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, “छान सामना आणि उत्तम निकाल. चॅम्पियन्स ट्रॉफी मायदेशी परत आणल्याबद्दल टीम इंडियाचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने शानदार खेळ केला. त्यांच्या शानदार कामगिरीबद्दल आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.”
An exceptional game and an exceptional result!
Proud of our cricket team for bringing home the ICC Champions Trophy. They’ve played wonderfully through the tournament. Congratulations to our team for the splendid all round display.
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार :
धडाकेबाज सुरुवात, दिमाखदार शेवट, शानदार खेळी!
अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघानं आपल्या विजयाची मोहोर उमटवली..!
आयसीसी मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये झालेल्या अंतिम सामान्यात भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला. या… pic.twitter.com/5hQ5tHEllv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 9, 2025
𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚’𝐬 𝐛𝐞𝐟𝐢𝐭𝐭𝐢𝐧𝐠 𝐚𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐭𝐨 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬!#ChampionsTrophy2025 #RohitSharma pic.twitter.com/CzclJlb8VF
— BJP (@BJP4India) March 9, 2025





