Ravindra Jadeja Broke Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवला जात आहे. रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी पहिल्या डावात अप्रतिम कामगिरी करत 5 बळी घेतले. यासह जडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीत 14 वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी करताना माजी पाकिस्तानी खेळाडूचा विक्रम मोडीत काढला. तसेच त्यानं मिचेल स्टार्कशीही बरोबरी साधली आहे.
जडेजाच्या नावावर मोठा विक्रम….
जडेजा न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेली जडेजाची जादू तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाली, जेव्हा त्याच्या फिरकी गोलंदाजीसमोर किवी फलंदाज असह्य दिसले. जडेजाने पाच विकेट घेत माजी पाकिस्तानी खेळाडू फजल महमूदचा विक्रम मोडला.
फजल महमूदने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 13 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मात्र आता जडेजा त्याच्या पुढे गेला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 14 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 14व्यांदा अशी कामगिरी करताना मिचेल स्टार्कची बरोबरी केली आहे. स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 14 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
A round of applause for Ravindra Jadeja! 👏 👏
He scalps his 1⃣4⃣th FIFER in Test cricket ✅
Well done! 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/I1UwZN94CM
— BCCI (@BCCI) November 1, 2024
कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारे गोलंदाज
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका): 67 वेळा
2. आर अश्विन (भारत): 37 वेळा
3. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया): 37 वेळा
4. आर.जे. हॅडली (न्यूझीलंड): 36 वेळा
5. अनिल कुंबळे (भारत): 35 वेळा
49. रवींद्र जडेजा (भारत): 14 वेळा
दरम्यान, जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याच्या बाबतीत आता जगात 49व्या स्थानावर पोहोचला आहे. यामध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 67 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.