IND vs NZ (Ravindra Jadeja New Record) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आज कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने सामन्यात दमदार सुरुवात केली. पण, भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि आपल्या कारकिर्दीत 14 वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी करताना न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. या शानदार कामगिरीमुळे जडेजाने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. जडेजाने मुंबई कसोटीत न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 5 बळी घेतले आणि कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा 5वा भारतीय गोलंदाज ठरला. जडेजाने न्यूझीलंडच्या डावाच्या 53 व्या षटकात ग्लेन फिलिप्स (17) च्या रूपाने तिसरी विकेट घेत ही कामगिरी केली. झहीर खान (311 विकेट) आणि इशांत शर्मा (311 विकेट) यांना मागे टाकून फिलिप्स हा त्याचा 312 वा कसोटी बळी ठरला आणि यासह तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा 5वा खेळाडू ठरला. IND vs NZ 3rd Test : जडेजा-सुंदरची चमकदार कामगिरी, न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत आटोपला…. कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज :- 1. अनिल कुंबले – 619 2. रविचंद्रन अश्विन – 553 3. कपिल देव – 434 4. हरभजन सिंह – 417 5. रविंद्र जडेजा – 314* 6. जहीर खान – 311 7. ईशांत शर्मा – 311 दरम्यान, न्यूझीलंडच्या पहिल्या डावात जडेजाने विल यंग (71), टॉम ब्लंडेल (0), ग्लेन फिलिप्स (17), इश सोधी (7) आणि मॅट हेन्री (0) यांचे बळी घेतले. पुणे कसोटीत चांगलाच महागडा ठरलेल्या जडेजाने मुंबई कसोटीत मात्र 22 षटकांत 65 धावांत 5 बळी घेत न्यूझीलंडला 235 धावांच्या लक्ष्यापर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.