India vs New Zealand 3rd Test Day 3 Highlights : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटी सामन्याचा निकाल सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातच समोर आला. बेंगळुरूनंतर पुण्यात आणि आता मुंबईत भारताला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे घरच्या मैदानावर भारताला प्रथमच 3 किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.
न्यूझीलंडने मुंबई कसोटी ही 25 धावांनी जिंकली आणि भारताविरूध्दची मालिका 3-0 ने जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रथमच, न्यूझीलंड संघाने मायदेशात किंवा परदेशी भूमीवर कसोटी मालिकेत 3 कसोटी सामने जिंकले आहेत. इतकंच नाही तर परदेशी भूमीवर सलग तीन कसोटी जिंकण्याचा त्यांचा हा पहिलाच विक्रम आहे.एजाज पटेलने न्यूझीलंडच्या दोन्ही डावात पंजे (पाचपेक्षा जास्त बळी) उघडले आणि सामन्यात एकूण 11 बळी घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. या मैदानावर त्याने यापूर्वी एका डावात 10 विकेट्सही घेण्याचा पराक्रम देखील केला आहे.
त्याच वेळी, भारताला आपल्या भूमीवर 3 किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत अद्याप क्लीन स्वीपचा सामना करावा लागला नव्हता, परंतु आता ते घडले आहे. भारताला आपल्या भूमीवर शेवटच्या वेळी 2000 साली क्लीनस्वीपला सामोरे जावे लागले होते, जेव्हा दक्षिण आफ्रिकेने मुंबईतच धावांचा पाठलाग करताना हा पराक्रम केला होता.
#TeamIndia came close to the target but it's New Zealand who win the Third Test by 25 runs.
Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4BoVWm5HQP
— BCCI (@BCCI) November 3, 2024
मुंबई कसोटीतील या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून न्यूझीलंडच्या 10 विकेट्स घेऊन त्यांना 235 धावांवर रोखलं. यात जडेजाने 5 विकेट्स घेतल्या. मात्र फलंदाजीच्या पहिल्या ङावामध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया ढेपाळली आणि ऋषभ पंत (60), शुभमन गिल (90), वॉशिंग्टन सुंदर (38), यशस्वी (30) वगळता इतर कोणतेही फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत आणि टीम इंडियाचा ङाव 263 धावसंख्येवर मर्यादित राहिला आणि केवळ 28 धावांची आघाडी घेतली.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या ङावामध्ये देखील टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विरुद्ध संघाला अवघ्या 174 धावसंख्येवर रोखले. टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचे सोपं आव्हान होते, मात्र दुसऱ्या ङावामध्ये सुद्धा टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज पुन्हा फ्लॉप ठरले. रोहित शर्मा 11 तर विराट कोहली हा 1 धाव करून बाद झाला. ऋषभ पंत (64) वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही आणि भारताचा 25 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला.