IND vs NZ 3rd T20 Live Streaming Free : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आज (२५ जानेवारी) गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकल्यास सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ३-० अशी अजेय आघाडी घेण्याची संधी आहे. मात्र, हा सामना फ्रीमध्ये कसं आणि कुठं पाहायचं? जाणून घेऊया. एकीकडे सूर्याचे नेतृत्त्वाखाली टीम इंडिया मालिका खिशात प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, मिचेल सँटनरचा किवी संघ मालिकेत टिकून राहण्यासाठी जीवाचे रान करेल. दोन्ही संघातील तिसरा सामना आज (२५ जानेवारी) संध्याकाळी सात वाजता बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग आणि प्रक्षेपण कुठे पाहाल? चाहत्यांच्या मनात या सामन्याच्या प्रक्षेपणाबाबत मोठी उत्सुकता आहे. हा सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्ही चॅनलवर स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर मोबाईलवर तुम्ही हा सामना जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर पाहू शकता. फ्रीमध्ये सामना कसा पाहायचा? भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी-२० सामना जर तुम्हाला हा सामना विनामूल्य (Free) पाहायचा असेल, तर त्याचे दोन सोपे पर्याय आहेत: १. मोबाईलवर: तुमच्या स्मार्टफोनमध्ये जिओ हॉटस्टार ॲप असल्यास, तुम्ही केवळ इंटरनेट डेटा वापरून हा सामना मोफत पाहू शकता. २. टीव्हीवर: ग्रामीण भागातील किंवा केबल नसलेले प्रेक्षक डीडी स्पोर्ट्स (DD Sports) चॅनलवर या सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात. हेही वाचा – Shahid Afridi Statement : “आयसीसी दुटप्पी वागतंय!” बांगलादेशच्या हकालपट्टीवर शाहिद आफ्रिदीचा संताप मालिकेत आतापर्यंत भारताचे वर्चस्व – या मालिकेत आतापर्यंत भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात २०९ धावांचे विशाल लक्ष्य ७ गडी राखून सहज गाठले. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये असून भारतीय गोलंदाजही किवी फलंदाजांना शांत ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.