IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. मालिका गमावलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी हर्षित राणाची निवड झाली आहे. बंगळुरूमधील मालिकेच्या सुरुवातीला हर्षित राणाला भारतीय संघात प्रवासी राखीव खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले होते, नंतर त्याला आसामविरुद्ध दिल्लीच्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर हर्षित राणाने दिल्लीकडून खेळताना आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने सात विकेट घेतल्या होत्या, याशिवाय त्याने अर्धशतकी खेळीही खेळली होती. दिल्ली संघाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. पदार्पण करू शकतो हर्षित राणा…. तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत ब्रेक दिला जाऊ शकतो आणि त्याच्या जागी हर्षित राणालाही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. मात्र, हर्षितचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे की त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. आता या 22 वर्षीय गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न मुंबईत पूर्ण होणार की ऑस्ट्रेलियात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होणार असून, त्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. Ranji Trophy 2024-25 : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी रजत पाटीदारची धमाकेदार कामगिरी, ठोकलं विक्रमी शतक… आयपीएल 2024 आणि दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी… हर्षित राणा आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता, जिथे त्याने 19 विकेट घेतल्या होत्या. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता संघाने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. यानंतर दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने आठ विकेट्स घेतल्या. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.