IND vs NZ 2nd Test : जे घडलं, ते अपेक्षित नव्हतं : कर्णधार शर्मा

IND vs NZ 2nd Test :- न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीमध्ये भारताला 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतावर मायदेशात 12 वर्षानंतर मालिका गमावण्याची वेळ आली. न्यूझीलंड संघाने आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच भारतात मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
लढतीनंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, सामान्यामध्ये जे घडलं, ते आम्हाला अपेक्षित नव्हते, त्यामुळे थोडा निराश आहे. न्यूझीलंड संघाने आमच्या पेक्षा चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाला आम्ही समर्थपणे तोंड देऊ शकलो नसल्याचे आम्ही स्वीकारले आहे. कसोटीमध्ये समोरच्या संघाचे 20 बळी मिळविण्याच्या बरोबरीने तेवढीच दमदार फलंदाजी देखील करणे अपेक्षित असते. आम्ही पुरेश्या धावा करू शकलो नाही हे वास्तव आहे.
झालेला पराभव हा एका खेळाडूंमुळे झालेला नाही. त्यामुळे आम्ही कसे हरलो, या संदर्भात मी जास्त बोलणार नाही. मात्र खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती, असे असले तरी फलंदाज म्हणून आम्ही कमी पडलो, हे मान्य करावेच लागेल, असे रोहित शर्मा म्हणाला.





