IPL 2025 : महेंद्रसिंग धोनी यंदा आयपीएलमध्ये खेळणार की नाही, सीएसकेच्या CEO नीं दिली धक्कादायक माहिती….

MS Dhoni Will Play In IPL 2025 Or Not : आयपीएलचा सर्वात मोठा चेहरा आणि लोकप्रिय खेळाडू कोणी असेल तर तो महेंद्रसिंग धोनी आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनी त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे, परंतु तो आयपीएल 2025 मध्ये खेळेल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या वर, चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचे सीईओ यांनी अशी माहिती दिली आहे की, ज्यामुळे धोनीचे चाहते आता गोंधळले आहेत.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्र सिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर जोडला गेला होता. मात्र, पाच वर्षांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर देखील त्याने आयपीएलमध्ये चेन्नई संघाने प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, आगामी आयपीएलच्या हंगामामध्ये धोनी सीएसके संघाकडून खेळणार की नाही, याबाबात साशंकता निर्माण झाली आहे.
बीसीसीआयच्या वतीने सर्व फ्रॅन्चायझीना कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली होती. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर असणाऱ्या खेळाडूला ‘अनकॅप्ड’ मानण्याचा नियम बीसीसीआयच्या वतीने पुन्हा आणण्यात आला आहे. असे असल्याने महेंद्रसिंग धोनी हा ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून खेळण्यास पात्र आहे.
एमएस धोनीने आयपीएल 2025 साठी अजून उपलब्ध असल्याचे कळविलेले नाही. मात्र, तो आमच्या संघासाठी या हंगामात देखील खेळात राहील अशी आशा आम्हाला आहे. धोनी 31 ऑक्टोबरपूर्वी आपल्या उपलब्धतेची पुष्टी करेल, असे मत चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी ईएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, एमएस धोनी हा पूर्णपणे तंदुरुस्त आहे. जो पर्यंत नियम बदलत नाहीत, तो पर्यंत तो खेळू शकतो, एवढी तंदुरुस्ती त्याच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पाहण्याची संधी मिळेल, असा विश्वास विश्वनाथन यांनी व्यक्त केला.
महेंद्रसिंग धोनीने 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत शेवटचा एकदिवसीय सामना खेळाला होता. त्याटणार त्याने ऑगस्ट 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. सध्याच्या घडीला धोनी आयपीएल वगळता कोणत्याच स्पर्धेत खेळत नाही. 2024 च्या हंगामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आले होते. त्यावेळी धोनीने संघात फिनिशरची भूमिका करताना 220 च्या स्ट्राईकरेटने 161 धावा चोपल्या होत्या.
इम्पॅक्ट प्लेयरच्या भूमिकेत ?
महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर मागील हंगामामध्ये त्याला वेदनेशी झगडताना सर्वानी पाहिले होते. चेन्नई संघ धोनीला संघात कायम ठेवण्यासाठी निश्चित उत्सुक असणार आहे. असे असले तरी धोनीच्या वयाचा विचार करता, कदाचित त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळविण्यात येऊ शकते. याचबरोबरीने यावेळी सीएसके, त्याच्यावर असणारी यष्टिरक्षणाची जबाबदारी देखील कमी करून त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळवू शकते.
Ranji Trophy 2024/25 : चेतेश्वर पुजारानं पुन्हा गाजवलं मैदान, द्विशतक झळकावत रचली विक्रमांची मालिका…
ऋतुराज, जडेजा, दुबे, पार्थिराना
धोनीच्या आगामी आयपीएल मधील सहभागाबद्दल साशंकता निर्माण झाली असताना, चेन्नई मेगा लिलावापूर्वी कर्णधार ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा व शिवम दुबे व श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पार्थिराना या चार खेळाडूंना कायम ठेवण्याची तयारी करत आहे. मागील हंगामामधे या चारही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती.
धोनीची तयारी सुरु
एमएस धोनीने आयपीएलच्या हंगामासाठी तयारी सुरु केली असल्याचा दावा काही अहवालात करण्यात आला आहे. सध्या धोनी रांची येथील जेएससीए प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण व सराव करत आहे. या अहवालात धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा करण्यात आला असून तो, चेन्नईचे संघमालक व संघ व्यवस्थापनाकडे लवकरच आपल्या उपलबध्दतेची पुष्टी करेल.





