IND vs NZ 2nd ODI : कर्णधार डिव्हाईनची अर्धशतकी खेळी, न्यूझीलंडचे भारतासमोर 260 धावांचे लक्ष्य…

IND W vs NZ W 2nd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड महिलांचा दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमावून 259 धावा केल्या आहेत. मालिका आणि सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 260 धावांचे लक्ष्य आहे. भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्याचबरोबर पहिला विजय मिळवून न्यूझीलंड संघाचा मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असेल.
Innings Break!
Radha Yadav’s 4️⃣ wickets restrict New Zealand to 259/9
Chase coming up shortly ⏳
Updates ▶️ https://t.co/h9pG4I31li#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Mf3kvhOqXs
— BCCI Women (@BCCIWomen) October 27, 2024
सामन्यात कर्णधार सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स यांनी अर्धशतकी खेळी केल्या. सोफी डिव्हाईनने 86 चेंडूत 79 धावा केल्या तर अनुभवी सुझी बेट्सने 70 चेंडूत 58 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॉर्जिया प्लिमरने 50 चेंडूत 41 धावा तर मॅडी ग्रीनने 41 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले.
SL vs WI 3rd ODI : वेस्ट इंडिजनं मालिका गमावली पण अखेरचा सामना गाजवला, श्रीलंकेचा केला दारूण पराभव…
भारताकडून गोलंदाजीत राधा यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताकडून गोलंदाजीत राधा यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यासाठी तिनं 10 षटकात 69 धावा खर्च केल्या. तर दिप्ती शर्मानं 10 षटकात 30 धावा देत 2 गडी बाद केले. याव्यतिरिक्त प्रिया मिश्रा आणि सायमा ठाकोर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.




