IND vs NZ 1st Test Day 2 : टीम इंडियाचा 46 धावांत खुर्दा, हेन्री-विल्यमसमोर स्टार फलंदाजांनी टेकले गुडघे…

IND vs NZ 1st Test Day 2 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. यासह भारताच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. 1987 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत संघ 75 धावांत गारद झाला होता. तर आतापर्यंतच्या कसोटी इतिहासातील भारताची ही तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून गेला आणि दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र, कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय टीम इंडियासाठी आत्मघातकी ठरला.
Innings Break!#TeamIndia all out for 46.
Over to our bowlers now! 👍 👍
Match Updates ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GhqcZy2rby
— BCCI (@BCCI) October 17, 2024
दोघांनी गाठला दुहेरी धावसंख्येचा आकडा..
रिषभ पंतनं 49 चेंडूत केलेल्या 20 धावा ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने 63 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकलाही दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार रोहित शर्मा 2 धावा करून बाद झाला. त्याला टीम साऊदीने बोल्ड केले.
विराटसह 5 फलंदाज शून्यावर माघारी…
विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना तर खातेही उघडता आले नाही. याशिवाय कुलदीप 2,बुमराह 1 धाव काढून बाद झाला तर मोहम्मद सिराज 4 धावा काढून नाबाद राहिला. भारताच्या पहिल्या डावात फक्त 4 चौकार पाहायला मिळाले. यात पंतने 2 आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला.
Rohit, 2
Virat, 0
Sarfaraz, 0
Jaiswal, 13
Rahul, 0
Jadeja, 0
Ashwin, 0
Pant, 20
Bumrah, 1
Kuldeep, 246 ALL OUT! 😮 pic.twitter.com/fHWUamUvL4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 17, 2024
हेन्री-विल्यमसचा कहर…
न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने भेदक गोलंदाजी केली. त्यानं 13.2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रुर्क याने त्याला सुरेख साथ देत 12 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.
घरच्या मैदानावरील कसोटीतील निच्चांकी धावसंख्या
1.भारत विरुद्ध न्यूझीलंड- 31.2 षटकात 46 धावा, बंगळुरु (17 ऑक्टोबर 2024)
2. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 30.5 षटकात 75 धावा, दिल्ली, (25 नोव्हेंबर 1987)
3. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 20 षटकात 76 धावा, अहमदाबाद (3 एप्रिल 2008)
कसोटी इतिहासातील भारताची निच्चांकी धावसंख्या..
1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 21.2 षटकात 36 धावा, अॅडलेड (17 डिसेंबर 2020)
2. भारत विरुद्ध इंग्लंड 17 षटकात 42 धावा, लॉर्ड्स (20 जून 1974)
3. भारत विरुद्ध न्यूझीलंड 31.2 षटकात 46 धावा, बंगळुरु (17 ऑक्टोबर 2024)





