#INDvsNED | भारताचा विजय! नेदरलँड्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल

IND vs NED – टीम इंडियाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या सुपर-१२ च्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा ( IND vs NED ) ५६ धावांनी पराभव केला. भारताने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना नेदरलँड्ससमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते.
“नवाजचा तो वाईड चेंडू जर माझ्या पॅडला लागला असता तर…”,अश्विनचं धक्कादायक वक्तव्य!
प्रत्युत्तरात नेदरलँड्स संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावाच करू शकला. नेदरलँडकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर मोहम्मद शमीला १ बळी घेण्यात यश आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ६२ धावांची खेळी खेळली. तर रोहित शर्माने ३९ चेंडूत ५३ तर सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
विराटचं सलग दुसरं अर्धशतक
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात शानदार ८२ धावांची खेळी खेळली होती. त्याच खेळीची पुनरावृत्ती करताना विराटने नेदरलँडविरुद्धही ( IND vs NED ) ४४ चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली. विराटने प्रथम रोहितसोबत तिसऱ्या गड्यासाठी ७३ आणि सूर्यकुमार यादवसोबत ९५ धावांची भागीदारी केली.
For his superb batting display, @surya_14kumar bags the Player of the Match award as #TeamIndia beat Netherlands to seal their 2⃣nd win of the #T20WorldCup. 👏👏 #INDvNED
Scorecard 👉 https://t.co/Zmq1ap148Q pic.twitter.com/4ocyzx7i3k
— BCCI (@BCCI) October 27, 2022
केएल राहुलचं अपयश कायम
भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुल पाकिस्तानपाठोपाठ आता दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात राहुल केवळ ९ धावा करून बाद झाला. त्याला व्हॅन मॅकरेनने पायचीत केले. केएल राहुल गेल्या काही डावांपासून सातत्याने अपयशी ठरत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ४ धावा केल्या होत्या. टीम इंडियाचा स्पर्धेतील तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी खेळला जाणार आहे.





