“नवाजचा तो वाईड चेंडू जर माझ्या पॅडला लागला असता तर…”,अश्विनचं धक्कादायक वक्तव्य!

T20 WorldCup – २३ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना जगभरातील चाहत्यांना पाहायला मिळाला. सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकणार हे सांगणे कठीण होते. शेवटच्या षटकात अशा काही गोष्टी घडल्या ज्यावर कोणालाही सहज विश्वास बसणार नाही. या सगळ्यांमध्ये आर.अश्विनचा हजरजबाबीपणा पाहायला मिळाला.
कारण भारताला शेवटच्या १ चेंडूवर २ धावांची गरज होती. अशा वेळी नवाजने चेंडू अश्विनच्या पॅडवर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र अश्विनने त्याक्षणी हुशारी दाखवलं आणि तो चेंडू पंचांनी वाईड दिला. या सगळ्यावर बोलताना अश्विनने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
कार्तिक आऊट झाल्याने त्याच्यावर अश्विन खूपच रागावला पण…! सांगितली शेवटच्या चेंडूची कहाणी
या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने दमदार कामगिरी केली होती. त्याने ५३ चेंडूंचा सामना करता विजयी ८२ धावांची जोरदार खेळी खेळली. विराटच्या या खेळीनंतर जगभरातील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. नेते मंडळींपासून ते आजी-माजी खेळाडूंपर्यंत सर्वांनीच संघाला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दरम्यान शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्ट्यावर आर अश्विनने भाष्य केले आहे.
अश्विन त्याच्या आयुष्यात हा सामना कधीच विसरू शकणार नाही. कारण दिनेश कार्तिक त्याच्या चुकीने बाद झाला अन शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आर अश्विनला मैदानावर यावं लागलं. मात्र याठिकाणी त्याने हुशारीचा वापर केला आणि भारताला विजय मिळवुन दिला. अश्विन महाल की, “”जर नवाजचा तो चेंडू फिरून माझ्या पॅडवर आदळला असता तर मी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली असती. ‘खूप खूप धन्यवाद, ही माझी क्रिकेटची कारकीर्द खूप छान होती आणि तुम्हा सर्वांचे आभार’, असे त्याने हसत म्हटले.





