IND VS BAN T20 World Cup 2024: भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय ; “सेमीफायनल”मध्ये धडक?

आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला.या सामन्यात धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयानंतर भारत सेमीफायनलच्या अगदी जवळ पोहोचला आहे. भारताकडून या सामन्यात हार्दिकने 1, कुलदीप यादवने 3 ,बुमराहने 2, अर्शदीपने 2 विकेट घेतल्या. बांगलादेशकडून कर्णधार शांतोने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर इतर फलंदाजांपैकी तनजीद हसनने 29, लिटन दासने 13, रिशाद हुसेनने 24, शाकिब अल हसनने 11, महमुदुल्लाने 13 धावांची कामगिरी केली.
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर यांच्यात भारत विरुद्ध बांगलादेश सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने 38, रोहित शर्माने 23, रिषभ पंतने 36, शिवम दुबेने 34, हार्दिक पंड्याने 50 धावांची खेळी केली. तर बांगलादेशच्या गोलंदाजांना टीम इंडियाच्या 5 विकेट्स घेण्यात यश आले.
हार्दिक पंड्याने अर्धशतक करताना 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. पंड्याचे टी 20 मधील हे चौथे अर्धशतक ठरले. बांगलादेशच्या गोलंदाजांपैकी रिशाद हुसेन आणि तन्झिम हसन साकिब प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले.





