WTC 2025 Prize Money : क्रिकेटच्या उत्सवाला बक्षिसाची चमक; WTC फायनलची रक्कम दुप्पट, भारताला किती मिळणार बक्षीस?

आयसीसीने बक्षीस रक्कम दुप्पट केली
आयसीसीने म्हटले आहे की, २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी एकूण बक्षीस रक्कम ५.७६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ४९.२७ कोटी रुपये) आहे. हे गेल्या दोन हंगामापेक्षा खूपच जास्त आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, विजेत्या संघाला ३.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील. हे २०२१ आणि २०२३ मध्ये दिलेल्या १.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा खूपच जास्त आहे. उपविजेत्या संघाला २.१६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील, जे पूर्वीच्या ८००,००० अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर इतर संघांनाही बक्षीस मिळणार आहे.
It’s exciting to announce that the winner of the #WTC25 Final between South Africa and Australia will earn $3.6M, with the runner-up to receive $2.1M. The increase in prize money exhibits our efforts to prioritize Test cricket and build on momentum from previous WTC cycles. @ICC pic.twitter.com/GMgWxM7GSb
— Jay Shah (@JayShah) May 15, 2025
भारतीय संघाला किती मिळणार रक्कम?
२०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला. त्यांनी पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध मालिका जिंकल्या. यामुळे, भारताविरुद्धची घरची मालिका अनिर्णित राहिली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला ३-१ ने हरवून ऑस्ट्रेलियाने पात्रता मिळवली. यावेळी भारत तिसऱ्या स्थानावर राहिला. दोन वेळच्या उपविजेत्या भारतीय संघाला १.४४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे १२.३१ कोटी रुपये) मिळतील. बक्षीस रक्कम मिळवणाऱ्या संघांमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Neeraj Chopra Honor : गोल्डन बॉयने इंडियन आर्मीची सोडली साथ! ‘या’ कारणामुळे दिला राजीनामा
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ साठी बक्षीस रक्कम :
विजेता (ऑस्ट्रेलिया/दक्षिण आफ्रिका): US$३,६००,००० ( सुमारे ३०.७९ कोटी रुपये)
उपविजेता (ऑस्ट्रेलिया/दक्षिण आफ्रिका): US$२,१६०,००० ( सुमारे १८.४७ कोटी रुपये)
तिसरे स्थान (भारत): US$१,४४०,००० ( सुमारे १२.३१ कोटी रुपये)
चौथे स्थान (न्यूझीलंड): US$१,२००,०००
पाचवे स्थान (इंग्लंड): US$९६०,०००
सहावे स्थान (श्रीलंका): US$८४०,०००
सातवे स्थान (बांगलादेश): US$७२०,०००
आठवे स्थान (वेस्ट इंडिज): US$६००,०००
नववे स्थान (पाकिस्तान): US$४८०,००० ( सुमारे ४.१० कोटी रुपये)





