IND vs ENG : एक-दोन नव्हे, ३ विश्वविक्रम; शुबमन गिलच्या आधी जगात कोणीही केला नव्हता ‘असा’ धमाका

पहिल्या डावात ठोकले द्विशतक –
शुबमन गिलने पहिल्या डावात अतिशय संयमी फलंदाजी केली आणि ३८७ चेंडूंमध्ये एकूण २६९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३० चौकार आणि तीन षटकार लगावले. फलंदाजी करताना त्याने कोणतीही घाई दाखवली नाही. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या डावातही त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत १६१ धावा जोडल्या.
‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू –
Take a bow, Captain Shubman Gill 👏👏
📸📸 The Centurion from Day 1 in Edgbaston! 💯#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/uC7ZJdoSEK
— BCCI (@BCCI) July 2, 2025
शुबमन गिल हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि १५० पेक्षा जास्ताधावांची खेळी साकारली. यापूर्वी क्रिकेट विश्वात कोणालाही हे साध्य करता आले नव्हते. या दमदार फलंदाजीने त्याने हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : कर्णधार गिलच्या चुकीमुळे बीसीसीआय अडचणीत? २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार
नॉन-ओपनर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम –
HUNDRED in Headingley 💯
HUNDRED in Edgbaston 💯
Captain Shubman Gill gets his 7th Test Century 🤩
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/tiMIKgi0k0
— BCCI (@BCCI) July 2, 2025
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. यासह त्याने एका कसोटी सामन्यात नॉन-ओपनर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकारा याच्या नावावर होता. संगकाराने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात ४२४ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs ENG : पराभवाच्या भीतीने ब्रूक गिलसमोर करू लागला गयावया, VIDEO होतोय व्हायरल
ग्रेग चॅपल यांचा विक्रम मोडला –
कर्णधार गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपल यांच्या नावावर होता. चॅपल यांनी १९७४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३८० धावा केल्या होत्या. शिवाय, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४०० हून अधिक धावा करणारा गिल हा एकमेव फलंदाज आहे.





