IND vs ENG : कर्णधार गिलच्या चुकीमुळे बीसीसीआय अडचणीत? २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार

Shubman Gill Nike Brand Controversy in IND vs ENG 2nd Test : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलकडून एक मोठी चूक झाली आहे. त्याच्यावर नियम मोडल्याचा आरोप आहे, ज्यामुळे २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. हा वाद एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी समोर आलेल्या शुबमन गिलच्या एका फोटोमुळे उफाळला आहे. नेमका हा वाद काय आहे आणि नव्या कर्णधाराला का चर्चेत आणले आहे, काय आहे हा वाद? जाणून घेऊया.
चौथ्या दिवशी भारतीय डाव घोषित करताना शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत गिल नाइकीचे काळ्या रंगाचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अॅडिडास आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लोक आता प्रश्न विचारत आहेत की, असे करणे कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचे?
अॅडिडासचा करार आणि संभाव्य परिणाम
Shubhman Gill declares the innings…
and maybe his next big brand deal too.#Adidas is on the jersey but #Nike stole the frame.#JustSaying @sjlazars @manishasinghal @ErikaMorris79 @rpramodhkumar pic.twitter.com/48m5MC3m8u— Aman Gulati 🇮🇳 (@iam_amangulati) July 6, 2025
बीसीसीआयचा किट प्रायोजक अॅडिडास असताना कर्णधार शुबमन गिलने उघडपणे नाइकीची बनियान घातल्याने अॅडिडास प्रश्न उपस्थित करू शकते. जर त्यांनी इच्छा दर्शवली, तर बीसीसीआयविरुद्ध नोटीस बजावली जाऊ शकते किंवा कायदेशीर कारवाईसाठी ते कोर्टातही जाऊ शकतात. या प्रकरणात पुढे काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा – IND vs ENG : पराभवाच्या भीतीने ब्रूक गिलसमोर करू लागला गयावया, VIDEO होतोय व्हायरल
गिल आणि नाइकी यांचे नाते काय?
शुबमन गिल हा नाइकीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, त्यामुळे त्याच्याकडे नाइकीची बनियान असणे स्वाभाविक आहे. एक मत असेही आहे की, ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या खेळाडूकडून अशी चूक झाल्यास त्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. यामुळे या प्रकरणात गिलपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जबाबदार ठरेल.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा ऐतिहासिक धमाका! ‘हा’ पराक्रम करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला
२०२३ मध्ये झाला होता २५० कोटींचा करार –
Will Adidas fine Gill for donning Nike here?
I know the inner is a personal gear and not part of the kit that Adidas provides, but back in 2006-07, Ganguly was penalised for sporting a Puma headband when the Nike was the kit sponsor. pic.twitter.com/Q7tklZDxkU
— Karan Khera 👋 (@karank_) July 5, 2025
२०२३ मध्ये बीसीसीआयने अॅडिडाससोबत ५ वर्षांचा (२०२८ पर्यंत) करार केला होता, ज्याची किंमत २५० कोटींहून अधिक आहे. यापूर्वी नाइकी हेच भारतीय संघाचे किट प्रायोजक होते, पण त्यांचा करार २०२० मध्ये संपला. त्यानंतर बायजूस आणि एमपीएल यांसारखे प्रायोजक बीसीसीआयशी जोडले गेले. २०२३ मध्ये अॅडिडाससोबत हा मोठा करार झाला, जो सध्या कायम आहे.





