IND vs ENG : लॉर्ड्सवर केएल राहुलचे पुन्हा एकदा वर्चस्व! जबरदस्त शतक ठोकत नोंदवला खास विक्रम

IND vs ENGKL Rahul’s 2nd Century at Lord’s Test Match : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 10 गडी गमावून 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनीही दमदार खेळी केली. विशेषतः केएल राहुलने लॉर्ड्सवर पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी राहुलने शानदार शतक झळकावत एका खास यादीत स्थान पटकावलं आहे.
पहिला आशियाई सलामी फलंदाज ठरला –
केएल राहुलने लॉर्ड्सवर दुसऱ्यांदा शतक ठोकले आहे. यापूर्वी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने शतक केले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील 10 वे शतक आहे. त्याने 176 चेंडूत हे शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत त्याने एकूण 13 चौकार मारले. या मालिकेतील त्याचे दुसरे शतरक आहे. यापूर्वी लीड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात राहुलने शानदार शतक ठोकले होते. तिथे त्याने दुसऱ्या डावात 247 चेंडूंमध्ये 137 धावांची खेळी केली होती.
💯 runs
1⃣7⃣7⃣ deliveries
1⃣3⃣ foursA knock of patience and composure from @klrahul ✨
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/Rde8gXhF5a
— BCCI (@BCCI) July 12, 2025
तसेच लॉर्ड्स येथे शतक झळकावताच तो पहिला आशियाई सलामी फलंदाज ठरला, ज्याच्या नावावर या मैदानावर दोन कसोटी शतके आहेत. यापूर्वी 2021 मध्ये त्याने लॉर्ड्सवर 129 धावांची शतकी खेळी केली होती. इंग्लंडमध्ये हे राहुलचे चौथे शतक आहे. 2000 नंतर इंग्लंडमध्ये सलामी फलंदाजाने झळकावलेल्या शतकांमध्ये ही दुसरी सर्वाधिक शतके आहेत. यापूर्वी ग्रॅम स्मिथने पाच शतके झळकावली होती.
भारताचा पहिला फलंदाज ठरला –
At Lords, @klrahul delivered yet again, his 2nd century on this historic ground, becoming only the 2nd Indian to do so. #ENGvIND 👉 3rd TEST, DAY 3 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/YhqadvE3Be pic.twitter.com/IvPIBFIBKY
— Star Sports (@StarSportsIndia) July 12, 2025
केएल राहुलने 29 व्या वर्षी लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर दोनदा आपले नाव कोरणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, दुर्दैवाने तो शतक ठोकल्यानंतर लगेचच शोएब बशीरच्या गोलंदाजीवर झेलबाद माघारी परतला. केएल राहुलने या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीला सुरुवात केली आणि तिसऱ्या दिवसापर्यंत सुरुवातीपासून स्थिर फलंदाजी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज होता.
हेही वाचा – IND vs ENG : केएल राहुलची लॉर्ड्समध्ये कमाल! सेहवाग-अन्वरला मागे टाकत केला मोठा पराक्रम
जगातील चौथाच फलंदाज ठरला-
केएल राहुलने इंग्लंडच्या भूमीवर एकूण चार शतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, तो इंग्लंडमध्ये दोन किंवा त्याहून अधिक शतके ठोकणारा चौथा परदेशी सलामी फलंदाज ठरला आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राउन, वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम स्मिथ यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.





