IND vs ENG : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! व्हिव्हियन रिचर्ड्सचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’

IND vs ENG Rishabh Pant Breaks Vivian Richards Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावा रोखला. यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत ४ बाद २४८ धावा केल्या होत्या. यादरम्यान ऋषभ पंतने ७४ धावांची शानदार खेळी साकाली. ज्यामध्ये त्याने आठ चौकारांसह दोन षटकार मारत इंग्लंडविरुद्ध इतिहास रचला आहे. त्याचबरोबर त्याने व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडण्याचा पराक्रमही केला.
ऋषभ पंतने रिचर्ड्सचा मोडला विक्रम –
ऋषभ पंतने या सामन्यात षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. यासह तो इंग्लंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह त्याने व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे टाकले. पंतने बेन स्टोक्सला षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकारासह त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३५ षटकार लगावले आहेत. यामुळे त्याने व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा ३४ षटकारांचा विक्रम मोडला.
5⃣0⃣ up for vice-captain Rishabh Pant 👍
1⃣0⃣0⃣-run partnership between him & KL Rahul 🤝
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSmBg#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 | @klrahul pic.twitter.com/wUbL8NerUT
— BCCI (@BCCI) July 12, 2025
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
- ऋषभ पंत: ३५ षटकार
- व्हिव्हियन रिचर्ड्स: ३४षटकार
- टिम साउदी: ३०षटकार
- यशस्वी जैस्वाल: २७ षटकार
- शुबमन गिल: २६षटकार
हेही वाचा –IND vs ENG : लॉर्ड्सवर केएल राहुलचे पुन्हा एकदा वर्चस्व! जबरदस्त शतक ठोकत नोंदवला खास विक्रम
रिचर्ड्स यांनी १७ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध ३६ कसोटी सामन्यांत ३४ षटकार लगावले होते. दुसरीकडे, पंत सध्या लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध आपला १२वा कसोटी सामना खेळत आहे आणि त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह त्याने भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.
रोहित शर्माच्या विक्रमाची केली बरोबरी –
ऋषभ पंतने पहिल्या डावात भारतासाठी ११२ चेंडूंवर ७४ धावा केल्या आणि केएल राहुलसोबत चौथ्या गडीसाठी १४१ धावांची भागीदारी केली. 66व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सने पंतला धावबाद केले. दरम्यान पंतने धावबाद होण्यापूर्वी आठ चौकार आणि दोन षटकार मारले. यासह त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण षटकारांची संख्या ८८ झाली आहे. त्याने रोहित शर्माच्या षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय फलंदाजांमध्ये फक्त वीरेंद्र सेहवाग (९१ षटकार) यानेच पंतपेक्षा जास्त षटकार मारले आहेत.





