IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीमध्ये ‘ओली पोप’चे द्विशतक हुकले, तरीही भारताविरूध्द केला ‘हा’ मोठा विक्रम…

India vs England 1st Test : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 202 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 420 धावा करत सर्वबाद झाला. पोपला पहिल्या डावात इंग्लंडसाठी विशेष काही करता आले नाही. अवघ्या 1 धावा करून तो बाद झाला होता. त्यानंतर, दुसऱ्या डावात इंग्लंडकडून तिसऱ्या क्रमांकावर ओली पोप फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने 278 चेंडूंचा सामना करत 196 धावा केल्या. पोपच्या या खेळीत 21 चौकारांचा समावेश होता. त्याच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात 400 धावांचा टप्पा ओलांडला. जरी तो द्विशतक झळकावण्यास चुकला असला तरी या खेळीच्या जोरावर पोपने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
भारतातील सर्वोत्तम कसोटी स्कोअर…
ओली पोपचा हा भारतातील सर्वोत्तम कसोटी स्कोअर होता. परदेशी खेळाडूंच्या यादीत अँडी फ्लॉवरच्या नावावर भारतातील कसोटीच्या दुसऱ्या डावात सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने 2000 मध्ये नागपुरात 232 धावा केल्या होत्या. या यादीत पोप चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मॅक्क्युलम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2010 मध्ये 225 धावा केल्या होत्या. गॅरी सोबर्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कानपूरमध्ये त्यांनी 198 धावा केल्या होत्या.
Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा, ICC ने घेतला ‘हा’ निर्णय…
माजी कर्णधार ॲलिस्टर कूकला टाकले मागे …
तसेच ओली पोप हा भारतीय भूमीवर कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. पण आता ओली पोपने आपल्या माजी कर्णधाराला मागे सोडले आहे. ॲलिस्टर कूकने 2012 मध्ये अहमदाबादमध्ये 176 धावांची इनिंग खेळली होती, मात्र आता ऑली पोपने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.





