IND vs ENG : ऋषभ पंतच्या खेळीने केएल राहुल ‘इम्प्रेस’, पहिल्या दिवसानंतर जोडले हात, पाहा VIDEO

IND vs ENG KL Rahul to fold hands to Rishabh Pant : लीड्स येथे सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी शतके झळकावली, तर ऋषभ पंत याने १०२ चेंडूंमध्ये ६५ धावा करत नाबाद परतला. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये परतलेल्या ऋषभ पंतला केएल राहुलने हात जोडले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
ऋषभ पंतच्या खेळीने केएल राहुल ‘इम्प्रेस’ –
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा शुबमन गिल आणि ऋषभ पंत ड्रेसिंग रूममध्ये परतले, तेव्हा भारतीय संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफने त्यांचे टाळ्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी केएल राहुलने गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. जेव्हा ऋषभ पंत ड्रेसिंग रूमकडे आला, तेव्हा केएल राहुलने त्याच्यासमोर हात जोडले. पंतने या खेळीत असे काही शॉट्स खेळले होते, जे पाहून सर्वजण थक्क झाले. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या षटकात त्यांनी ख्रिस वोक्सच्या चेंडूवर मारलेला षटकार प्रेक्षकांना विशेष आवडला.
ऋषऊ पंतला शतक झळकावण्याची संधी –
𝗥𝗮𝘄 𝗘𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀
Straight from the #TeamIndia Dressing Room after the end of an exciting Day 1 at Headingley#ENGvIND pic.twitter.com/oj4kWMSbeW
— BCCI (@BCCI) June 20, 2025
ऋषभ पंतला आज कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही त्याची लय कायम ठेवायची आहे. जर त्याने दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान पहिले काही षटके काळजीपूर्वक खेळली तर तो शतक पूर्ण करू शकतो. पंतच्या नावावर इंग्लंडमध्ये दोन शतके आहेत. त्याने २०१८ मध्ये एक शतक झळकावले होते. पंतने २०२२ मध्ये दुसरे शतक झळकावले. दरम्यान, लीड्स कसोटीत ६५ धावांच्या खेळीदरम्यान पंतने एमएस धोनीचा मोठा विक्रमही मोडला. तो आता सेना देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.
हेही वाचा – MPL 2025 : फलंदाजांची जोरदार टक्कर अन् राहुल त्रिपाठीची ‘ती’ चूक, VIDEO होतोय तुफान व्हायरल
केएल राहुलने खराब शॉट खेळून गमावली विकेट –
केएल राहुलबद्दल बोलायचे तर, या सामन्यात त्याला शानदार सुरुवात मिळाली होती. यशस्वी जैस्वालसोबत मिळून त्याने ९१ धावांची सलामीची भागीदारी केली. राहुलची फलंदाजी पाहता असे वाटत होते की तो मोठी खेळी करू शकतो. पण ब्रायडन कार्सच्या चेंडूवर खराब शॉट खेळू त्याने आपली विकेट गमावली. त्याने ७८ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. ज्यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता.





