IND vs ENG : ‘बॅझबॉल सोडा अन्…’, भारताचा ऐतिहासिक विजय रोखण्यासाठी वॉनने इंग्लंडला सांगितला फॉर्म्युला

IND vs ENG Michael Vaughan Advises to England : एजबॅस्टन कसोटीत भारताने इंग्लंडसमोर 608 धावांचे लक्ष्य ठेवले आहे, जे पार करणे यजमान संघाला जवळपास अशक्य आहे. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने बर्मिंगहॅम येथे भारताला ऐतिहासिक विजय मिळवण्यापासून रोखण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. त्याने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अनिर्णित (ड्रॉ) निकालासाठी खेळण्याचा सल्ला दिला आहे.
इंग्लंडसमोर 608 धावांचे जवळपास अशक्यप्राय लक्ष्य आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 72 धावा केल्या होत्या. रविवारी, शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 536 धावांची गरज आहे, तर भारताला 7 गडी बाद करायचे आहेत. विशेष म्हणजे, भारताने बर्मिंगहॅम येथे आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
Stumps on Day 4 in Edgbaston!
A magnificent day for #TeamIndia comes to an end 🙌
India need 7⃣ wickets on the final day to win the 2nd Test
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/tttip5pAbg
— BCCI (@BCCI) July 5, 2025
‘बॅझबॉल’ धोरण सोडण्याचा सल्ला –
बेन स्टोक्सच्या कर्णधारपदाखाली आणि ब्रेंडन मॅककुलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडची कसोटी टीम चौथ्या डावात मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करण्यास घाबरत नाही. मात्र, वॉनने इंग्लंडला बर्मिंगहॅम कसोटीच्या पाचव्या दिवशी त्यांची आक्रमक ‘बॅझबॉल’ रणनीती सोडून सावध खेळण्याचा सल्ला दिला आहे, कारण चौथ्या डावात इतके मोठे लक्ष्य साध्य करणे जवळपास अशक्य आहे. वॉन म्हणाला की, जर इंग्लंडने हा सामना अनिर्णित राखला, तर लीड्स येथील पहिल्या कसोटीतील विजयापेक्षा हा निकाल अधिक चांगला ठरेल. लीड्स येथे इंग्लंडने 371 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
हेही वाचा – IND vs ENG : एक-दोन नव्हे, ३ विश्वविक्रम; शुबमन गिलच्या आधी जगात कोणीही केला नव्हता ‘असा’ धमाका
सध्या सर्वोत्तम गोष्ट म्हणजे ड्रॉ करणे – वॉनचे मत
बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलशी बोलताना वॉन म्हणाला, “बॅझबॉलसमोर रविवारी सर्वात मोठा प्रश्न असेल की, संघ आणि खेळाडू त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्तीच्या पूर्णपणे विरुद्ध खेळतील का? तुम्हाला तेच साध्य करायचे आहे जे सर्वोत्तम आहे आणि सध्या सर्वोत्तम गोष्ट म्हणजे ड्रॉ.” वॉनने सांगितले की, स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 34 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडने केवळ एकदा ड्रॉ खेळला आहे, तर 21 सामने जिंकले आणि 12 गमावले. भारत किंवा ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध मोठ्या मालिकेत यशस्वी होण्यासाठी इंग्लंडला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – Wimbledon 2025 : नोव्हॉक जोकोविचचा ऐतिहासिक पराक्रम, विम्बल्डनमध्ये १०० सामने जिंकणारा ठरला तिसरा खेळाडू!
मॅच ड्रॉ करणे हे विजयाएवढेच महत्त्वाचे –
वॉन पुढे म्हणाला, “जर तुम्हाला भारतासारख्या संघाविरुद्ध स्वदेशात पाच सामन्यांची मोठी मालिका जिंकायची असेल आणि ऑस्ट्रेलियात जायचे असेल, तर मला वाटते की ‘फक्त जिंकायचे’ हा दृष्टिकोन ठेवणे अशक्य आहे. आम्ही ड्रॉसाठी खेळत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. या परिस्थितीत इंग्लंडसाठी ड्रॉ हा उत्तम पर्याय आहे. मला आशा आहे की यामुळे त्यांना आणखी यश मिळेल. जर त्यांनी इथून सामना ड्रॉ केला, तर गेल्या आठवड्यातील विजयापेक्षा हा निकाल जवळपास अधिक चांगला असेल, कारण हे त्यांच्या स्वाभावाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.”





