IND vs ENG : इंग्लंडचा कट! भारताला फसवण्यासाठी लीड्सच्या खेळपट्टीवर घातक डाव, क्युरेटरने वाढवली धडधड

IND vs ENG India Faces England in 1st Test at Leeds : भारतीय संघाला इंग्लंडच्या भूमीवर त्यांच्याच मैदानावर आव्हान द्यायचे आहे. दरम्यान, लीड्सच्या मैदानाचे प्रमुख रिचर्ड रॉबिन्सन यांनी सांगितले की, येथील असामान्य कोरड्या हवामानामुळे आणि इंग्लंडच्या आक्रमक खेळाच्या शैलीमुळे शुक्रवारी भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ‘चांगली खेळपट्टी’ मिळण्याची शक्यता वाढली आहे. लीड्स सामान्यतः मालिकेच्या मध्यभागी कसोटी सामन्याचे आयोजन करते, परंतु यंदा पहिल्या सामन्याच्या आयोजनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रिचर्ड रॉबिन्सन खेळपट्टीबद्दल काय म्हणाले?
रिचर्ड रॉबिन्सन यांनी ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ला सांगितलं, “त्यांना (इंग्लंडला) फक्त चांगली खेळपट्टी हवी आहे, ज्यावर आम्ही चेंडूला सीमारेषेवर पाठवू शकू. त्यांना हेच हवंय.” रॉबिन्सन यांना आशा आहे की सुरुवातीच्या दिवशी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल, पण अपेक्षित उष्णतेमुळे ती सपाट होईल. ही खेळपट्टी केवळ इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीला (प्रत्येक परिस्थितीत आक्रमक खेळण्याच्या शैलीला) अनुकूल ठरेलच, शिवाय भारताच्या युवा फलंदाजांच्या फळीला मालिकेतील सामन्यात टिकून राहण्याची अधिक संधीही देईल.
टीम इंडियाला स्वतःला सिद्ध करावे लागेल –
📸 📸 … 𝗮𝗻𝗱 𝘁𝗵𝗮𝘁’𝘀 𝗮 𝘄𝗿𝗮𝗽 𝗳𝗿𝗼𝗺 𝗕𝗲𝗰𝗸𝗲𝗻𝗵𝗮𝗺! pic.twitter.com/VSn1kHozTy
— BCCI (@BCCI) June 15, 2025
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात केएल राहुल सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) देशांमध्ये त्यांच्या साधारण कामगिरीमुळे त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. फलंदाजीच्या क्रमात यशस्वी जैयस्वालचाही समावेश आहे, जो वरिष्ठ संघासोबत इंग्लंडच्या पहिल्या दौऱ्यावर आला आहे.
हेही वाचा – SL vs BAN : शतकानंतर आक्रमक सेलिब्रेशन करताना शांतोची अचानक उडाली भंबेरी, VIDEO होतोय व्हायरल
करुण नायरने शेवटचा कसोटी सामना २०१७ मध्ये खेळला होता. भारतीय संघ सोमवारी येथे पोहोचला, तर इंग्लंडने हेडिंग्ले येथे सराव सत्र आयोजित केले, जिथे दिवसभर खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती. भारताने गेल्या दोन दशकांत येथे फारसे क्रिकेट खेळलेले नाही. २०२१ मध्ये येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात संघाला डावाने पराभव स्वीकारावा लागला होता.





