IND vs ENG : तो चार वर्षांनी परत येतोय! लॉर्डस कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, संघात केला मोठा बदल

IND vs ENG 3rd Test England Announce Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १० जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडने आपली प्लेइंग जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात फक्त एक बदल केला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी जोफ्रा आर्चरचा प्लेइंग इलेव्हन समावेश करण्यात आला आहे.
चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन –
जोफ्रा आर्चर तब्बल चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. त्याला जोश टंगच्या जागी संधी देण्यात आली आहे. इंग्लंडचा गोलंदाजी आक्रमण या मालिकेत आतापर्यंत अतिशय कमकुवत दिसले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, आर्चरच्या पुनरागमनाने इंग्लंडचा बिघडलेला खेळ सुधारेल का आणि त्याच्या येण्याने संघाची गोलंदाजी युनिट मजबूत होईल का?
⏪ Throwing it back to Jofra Archer’s brutal spell against Steve Smith in 2019 😱🔥
📍 Lord’s, London pic.twitter.com/nb6t6c9eIo
— England Cricket (@englandcricket) July 9, 2025
भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील जोफ्रा आर्चरचा रेकॉर्ड –
जोफ्रा आर्चरने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १३ सामने खेळले असून, त्याच्या नावावर ४२ विकेट्स आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ४५ धावांत ६ विकेट्स अशी आहे, तर त्याची सरासरी ३१.६ आहे. मात्र, भारताविरुद्ध त्यानी केवळ २ सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमध्ये त्यांनी तीन डावांत ४ विकेट घेतले आहेत. भारताविरुद्ध त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ७५ धावांत २ विकेट अशी आहे.
हेही वाचा – Yash Dayal : ‘तिने आयफोन आणि लॅपटॉप चोरला अन्…’, गर्लफ्रेंडच्या आरोपांवर यश दयालचा धक्कादायक खुलासा!
हा रेकॉर्ड पाहता भारतीय फलंदाजांना आर्चरपासून घाबरण्याची गरज नाही; पण इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर तो खूपच धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांना त्याच्यासमोर सावधपणे फलंदाजी करावी लागेल. इंग्लंडमधील आर्चरचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यांनी आपल्या देशात ८ कसोटी सामन्यांमध्ये ३० विकेट घेतले आहेत. लॉर्ड्सवर त्यानी आतापर्यंत फक्त १ सामना खेळला असून, तिथे त्यानी ५ विकेट्स घेतल्या आहेत.
२०२१ मध्ये खेळला होता शेवटचा कसोटी सामना –
🚨
For the first time since 2021, Jofra Archer is set to play a Test for England!#ENGvIND #jofraarcher pic.twitter.com/O9N5FEk10N
— Cricbuzz (@cricbuzz) July 9, 2025
जोफ्रा आर्चर बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघाबाहेर होता. मात्र, त्यानी काउंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करून आपली सामना तंदुरुस्ती सिद्ध केली आणि त्यानंतर तो कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. जोफ्रा आर्चरने आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध फेब्रुवारी २०२१ मध्ये अहमदाबाद येथे खेळला होता. त्यानंतर तो कोपराच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. आता चार वर्षांनंतर त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
हेही वाचा – Sushil Kumar : जामीनावर बाहेर आलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार रेल्वे सेवेत दाखल
भारताविरुद्धच्या लॉर्डस कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर





