IND vs ENG : एक बिहारी इंग्लंडवर पडला भारी! आकाश दीपने १० विकेट्स घेत रचला नवा इतिहास

IND vs ENG Akash Deep Historic 10 Wicket Haul : बर्मिंगहम येथील एजबॅस्टन मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय 336 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलसह वेगवान गोलंदाजी आकाश दीपने महत्त्वाची भूमिका निभावली. यासह आकाश दीपने नवा इतिहास रचला आहे. तो 93 वर्षात इंग्लंमध्ये 10 विकेट्स घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला आहे.
बिहारचा 28 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने पहिल्या डावात 88 धावांत 4 विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या डावात सहा इंग्लिश फलंदाजांना बाद केले. दुसऱ्या डावातील त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर त्याने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेणारा ९३ वर्षांत दुसरा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवत इतिहास रचला.
📸📸
The historic moment 🤩
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/RbofZTKzDk
— BCCI (@BCCI) July 6, 2025
भारताने इंग्लंडमध्ये आपला पहिला कसोटी सामना जून 1932 मध्ये लॉर्ड्स येथे खेळला होता, परंतु गेल्या 93 वर्षांत आकाश दीपच्या आधी फक्त एकच भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 10 इंग्लिश फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरला होता. हा पराक्रम चेतन शर्माने केला होता. 1986 मध्ये एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात शर्माने पहिल्या डावात 29.3 षटकांत 130 धावांत चार बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात 24 षटकांत 58 धावांत सहा इंग्लिश फलंदाजांना बाद केले होते.
हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाने रचला इतिहास! एजबॅस्टनमध्ये ५८ वर्षानंतर पहिल्यांदाच फडकवला विजयाचा झेंडा
इंग्लंडमधील भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी:
- 10/187 आकाश दीप बर्मिंगहॅम, 2025
- 10/188 चेतन शर्मा बर्मिंगहॅम, 1986
- 9/110 जसप्रीत बुमराह ट्रेंट ब्रिज, 2021
- 9/134 झहीर खान ट्रेंट ब्रिज, 2007
एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात आकाश दीपने बेन डकेट (0), ऑली पोप (0), हॅरी ब्रूक (158) आणि ख्रिस वोक्स (5) यांना बाद केले. शनिवारी संध्याकाळी दुसऱ्या डावात त्याने बेन डकेट (25) याला आपला दुसरा बळी बनवले. डावखुरा फलंदाज डकेटला आकाशने यष्टिमागे झेलबाद केले. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आकाशने जो रूटलाही बाद केले. दिग्गज इंग्लिश फलंदाज 15 चेंडूंवर 6 धावा काढून खेळत होता, तेव्हा आकाशने त्याच्या बचावाला भेदून क्लीन बोल्ड केले.
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालने जिंकली मनं! १२ वर्षीय दृष्टिहीन चाहत्याला दिली खास भेट, पाहा VIDEO
आकाश दीपने पहिल्यांदाच घेतल्या १० विकेट्स –





