IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…

Ravichandran Ashwin | टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवी अश्विनने राजकोट कसोटीत इतिहास रचला आहे. वास्तविक, रवी अश्विनने कसोटीत 500 बळींचा आकडा गाठला आहे. रवी अश्विनने 98 सामन्यात 500 बळी घेण्याचा पराक्रम केला.
भारतीय ऑफस्पिनरने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी प्रकारात ही कामगिरी केली. अशाप्रकारे रवी अश्विन कसोटीत 500 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर रवी अश्विन कसोटीत 500 बळी घेणारा 9वा गोलंदाज ठरला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे.
𝙏𝙝𝙖𝙩 𝙇𝙖𝙣𝙙𝙢𝙖𝙧𝙠 𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩! 👏 👏
Take A Bow, R Ashwin 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XOAfL0lYmA
— BCCI (@BCCI) February 16, 2024
मुथय्या मुरलीधरनच्या नावावर 800 कसोटी बळी आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिमी अँडरसन तर चौथ्या क्रमांकावर भारतीय दिग्गज अनिल कुंबळे आहे. जिमी अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावे अनुक्रमे 695 आणि 619 बळी आहेत. यानंतर या यादीत स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅकग्रा, कोर्टनी वॉल्श आणि नॅथन लायन यांच्या नावांचा समावेश आहे.
𝗠𝘁. 𝟱𝟬𝟬! 🫡 🫡
Only the second #TeamIndia cricketer to reach this landmark in Tests 🙌 🙌
Congratulations, @ashwinravi99 👏 👏#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bP8wUs6rd0
— BCCI (@BCCI) February 16, 2024
1. मुथय्या मुरलीधरन(श्रीलंका) : 800 बळी (133 सामने)
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : 708 (145)
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) : 696*(185)
4. अनिल कुंबले (भारत) : 619(132)
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : 604(167)
6. ग्लेन मैक्ग्रा (ऑस्ट्रेलिया) : 563(124)
7. कोर्टनी वॉल्श (वेस्टइंडीज) : 519(132)
8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) : 517(127)
9. रविचंद्रन अश्विन( भारत) : 500*(98)
रवी अश्विनची कसोटी कारकीर्द…
रवी अश्विनच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर या गोलंदाजाने 98 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रवी अश्विनने कसोटी सामन्यात 500 विकेट्स घेतल्या आहेत. रवी अश्विनने कसोटी सामन्यात 23.89 च्या सरासरीने आणि 51.45 च्या स्ट्राईक रेटने विकेट घेतल्या आहेत. या भारतीय दिग्गज खेळाडूने 34 वेळा कसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय त्याने 8 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.





