IND vs ENG : धक्कादायक! शुबमन गिलच्या डोक्याला लागला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतासाठी कर्णधार शुबमन गिलने द्विशतक झळकावत २६९ धावांची खणखणीत खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभारता आला. मात्र, आता क्षेत्ररक्षण करताना कर्णधार गिलच्या डोक्याला चेंडू लागला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गिलच्या डोक्याला लागला चेंडू –
इंग्लंडच्या डावातील ३७ वे षटक रवींद्र जडेजाने टाकले. त्यावेळी क्रीजवर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक उपस्थित होते. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रूकने जोरदार फटका मारला, जो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलच्या दिशेने गेला. फटका इतका वेगवान होता की गिलला त्याचा नीट अंदाज घेता आला नाही आणि चेंडू त्याच्या हाताऐवजी डोक्याला जाऊन लागला. यामुळे मैदानावरील भारतीय खेळाडू थक्क झाले. तात्काळ फिजिओ त्याच्या तपासणीसाठी धावले. सुदैवाने, गिलला या चेंडूमुळे कोणतीही दुखापत झाली नाही.
Brothers🫂#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/OdClX7Cn49
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 4, 2025
जेमी स्मिथने झळकावले दमदार शतक –
या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. बेन डकेट आणि ऑली पोप यांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर झॅक क्रॉली १९ धावांवर बाद झाला. कर्णधार बेन स्टोक्स शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला, तर जो रूटने २२ धावा केल्या. यामुळे इंग्लंडचा संघ ८४ धावांवर पाच विकेट गमावून संकटात सापडला होता.
हेही वाचा – IND vs ENG : बर्मिंगहॅम कसोटीत फॉलोऑन टाळण्यासाठी इंग्लंडला किती धावांची गरज? काय आहे ICC चा नियम?
मात्र, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी संघासाठी चांगली फलंदाजी केली. स्मिथने मैदानावर वेगाने धावा जमवल्या आणि १०२ धावांची खेळी आणि तो अद्याप क्रीजवर आहे. हॅरी ब्रूकनेही ९१ धावांसह क्रीजवर पाय रोवले आहेत. इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत ५ बाद २४९ धावा केल्या असून, ते भारताच्या धावसंख्येपासून ३३८ धावांनी मागे आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : मियां भाईच्या मॅजिकची कमाल! सलग दोन चेंडूंवर रुट-स्टोक्सला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा VIDEO
शुबमन गिलने ठोकले तडाखेबंद द्विशतक –
भारतीय संघासाठी शुबमन गिलने २६९ धावांची जबरदस्त खेळी साकारली. यशस्वी जैस्वालने ८७ धावा, तर रवींद्र जडेजाने ८९ धावांचे योगदान दिले. खालच्या फळीतील वॉशिंग्टन सुंदरनेही चांगली फलंदाजी करत ४२ धावा जोडल्या. याच खेळींच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 587 धावांचा विशाल डोंगर उभारला.





