IND vs BAN : मूळचा बिहारचा असून बंगालतर्फे का खेळला आकाशदीप, जाणून घ्या ‘या’मागचे कारण….

Akash Deep : टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. 19 सप्टेंबरपासून संघाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारताने संघ जाहीर केला आहे. यामध्ये आकाश दीपला स्थान देण्यात आले आहे. आकाश दीपने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियासाठी एक कसोटी सामना देखील खेळला आहे.
आकाश दीप बंगालकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळत आहे. मात्र तो मूळचा बिहारचा आहे. आकाश दीप बिहारचा असून बंगालतर्फे का खेळला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलतर यामागे एक आश्चर्यकारक कारण आहे. वास्तविक, बिहार क्रिकेट असोसिएशन खूप वादात राहिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असोसिएशनवर बंदी देखील घालण्यात आली होती. याच कारणामुळे झारखंड आणि बंगालकडून खेळण्याची भूमिका अनेक क्रिकेटपटू घेतली होती. या यादीत आकाश दीपच्या नावाचाही समावेश आहे.
आकाशदीप बिहारमधील रोहतास येथील आहे. पण तो बंगालकडून खेळला. आकाश दीपने 2019 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. आकाश दीपने भारतासाठीही पदार्पण केले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण कसोटी खेळली होती.
देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड….
आकाश दीप भारतीय संघाकडून एक कसोटी खेळला आहे. यामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. त्याने 32 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत 116 बळी घेतले. आकाश दीपची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे प्रथम श्रेणी डावात 60 धावांत 6 बळी घेणे होय. आकाश दीपने लिस्ट ए चे 28 सामने खेळले आहेत. या कालावधीत 42 विकेट्स घेतल्या आहेत. 6 धावांत 3 बळी घेणे ही त्याची लिस्ट ए मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
क्रिकेटसाठी कुटुंबापासून राहिला दूर….
आकाश दीपचा प्रवास सोपा नव्हता. तो क्रिकेटसाठी पश्चिम बंगाल मधील आसनसोल येथे त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहत होता. फक्त क्रिकेटसाठीच तो कुटुंबापासून दूर राहिला. आता तो पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. बांगलादेशविरुद्ध आकाश दीप आपली ताकद दाखवू शकतो.





