ढाका – भारत आणि बांगलादेश ( IND vs BAN ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने ३ गडी राखून जिंकला. यासोबतच भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाला २-० असा क्लीन स्वीप दिला आहे. त्यामुळे आता भारताला या मालिका विजयाचा फायदा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात दोन्ही संघांमध्ये चांगलीच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या डावात बांगलादेशच्या मेहदी हसन याने त्याच्या गोलंदाजीने भारतीय संघाच्या फलंदाजाला धावांची झुंजवले. त्याने विराट कोहलीलाही बाद केले होते.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
विराट कोहलीचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. त्याच्या प्रसिद्धीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य चाहतेच नव्हे तर कित्येक क्रिकेटरही विराटला आपला आदर्श मानतात. त्याप्रमाणे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन हादेखील विराटचा चाहता असल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या डावात भारताच्या ५ गड्यांना बाद करणाऱ्या मेहदी हसनला विराट कोहलीने एक खास वस्तू भेट दिली आहे. याबाबतचा फोटो हसनने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
ढाका येथे झालेल्या दुसऱ्या ( IND vs BAN ) कसोटी सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसनने दमदार कामगिरी केली. त्याने भारताच्या शुभमन गिल, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना बाद केले होते. हसनच्या या कामगिरीनंतर त्याला विराट कोहलीकडून टीम इंडियाची जर्सी भेट म्हणून मिळाली. हसनने विराटसोबतच एक फोटो त्याच्या फेसबुक खात्यावरून शेअर केला आहे. सामन्यातील विराट आणि इतर बांगलादेशच्या खेळाडूंमधील तणावाचे वातावरण पाहता आता त्यांच्या या फोटोला चाहते मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत आहेत.
Facebook post by Mehidy about Virat Kohli. pic.twitter.com/fVg3CNfHWb
— Johns. (@CricCrazyJohns) December 25, 2022