IND Vs BAN : हार्दिक पंड्याचे अर्धशतक; भारताने बांगलादेशला दिले 197 धावांचे लक्ष्य
Updated On:

नवी दिल्ली : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम गोलंदाजी घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्मा याने 23, विराट कोहली 37, रिषभ पंत 36,शिवम दुबे 34, हार्दिक पंड्या 50 यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
तर बांगलादेशकडून तन्झिम हसन साकिबने 2 , रिशाद हुसेनने 2, शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.





