Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार जाहीर
क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल (Padma Awards) भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना 'पद्मश्री' (Padma Awards) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

Padma Awards : भारतीय क्रीडा जगतासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण समोर आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी, क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल (Padma Awards) भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ (Padma Awards) प्रदान करून गौरविण्यात आले.
हरमनप्रीत कौर: मोगा ते पद्मश्री… एक प्रेरणादायी प्रवास
पंजाबच्या मोगा या छोट्याशा शहरात ८ मार्च १९८९ रोजी जन्मलेल्या हरमनप्रीत कौरला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने भारतीय संघात स्थान तर मिळवलेच, पण पुढे जाऊन संघाचे यशस्वी नेतृत्वही केले. एका छोट्या शहरातून येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव मोठे करणाऱ्या हरमनप्रीतचा हा सन्मान प्रत्येक क्रीडाप्रेमीचा अभिमान वाढवणारा आहे.
ऐतिहासिक विश्वचषक विजय
हरमनप्रीत कौरच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने मागच्या वर्षी पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला होता. महिला क्रिकेटही पुरुषांच्या तोडीस तोड आहे आणि कुठेही मागे नाही, हे हरमनप्रीतने आपल्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवून सिद्ध करून दाखवले.
हरमनप्रीतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरमनप्रीतने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिले आहेत.तिने आतापर्यंत 7 कसोटी, 164 वनडे आणि 195 टी20 सामने खेळले आठहे. कसोटीत 230 धावा, वनडेत 4541 धावा आणि टी20 3991 धावा केल्या आहे. वनडे वर्ल्डकप 2017 मधील तिची नाबाद 171 धावांची कायम स्मरणात राहणारी आहे. तिने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरूद्ध चमकदार कामगिरी केली.
आगामी आव्हान: टी-२० वर्ल्डकप २०२६
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी सज्ज झाला आहे. जून महिन्यात या स्पर्धेला सुरुवात होत असून, तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाला गवसणी घालणार का? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जिद्दीचे दुसरे नाव: प्रवीण कुमार
या दिमाखदार सोहळ्यात पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा उंचवणारा पॅरा उंच उडीपटू प्रवीण कुमार यालाही ‘पद्मश्री’ पुरस्काराने (Padma Awards) सन्मानित करण्यात आले.शारीरिक दिव्यांगत्वावर मात करत प्रवीणने कधीही हार मानली नाही.
आपल्या अदम्य जिद्दीच्या जोरावर त्याने पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘T64’ गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. याशिवाय आशियाई खेळांमध्येही त्याने देशासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या याच अथक परिश्रमांचा गौरव आज पद्मश्री पुरस्काराच्या रूपाने झाला आहे.






