IND vs BAN : बांगलादेशने जिंकली नाणेफेक! भारताला फलंदाजीचे आमंत्रण, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2025 IND vs BAN Match : आशिया कप २०२५ मधील सुपर फोर फेरीतील तिसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. या सामन्याची नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार झाकेर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार तर भारताने कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघांनी सुपर फोर फेरीतील आपापला पहिला सामना जिंकला असून हा दुसरा सामना आहे.
भारत-बांगलादेश हेड टू हेड रेकॉर्ड –
आकडेवारीनुसार, हा सामना एकतर्फी होण्याची अपेक्षा आहे कारण बांगलादेशने दोन्ही संघांमधील १७ टी-२० सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रोहित शर्माला संशयाचा फायदा देऊन ‘नॉट आउट’ घोषित केल्यापासून दोन्ही संघांमधील सामने तणावपूर्ण आहेत. शेख हसीना सरकार पडल्यानंतर भारताचे बांगलादेशशी राजनैतिक संबंधही ताणले गेले आहेत.
Bangladesh won the toss and chose to bowl. Do you think Bangladesh will be able to win the match today?#INDvsBAN|#BANvsIND #AsiaCup2025 pic.twitter.com/3yVdaMKzXs
— BABAR🐐 (@BABAR9492) September 24, 2025
या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑगस्ट २०२५ मध्ये बांगलादेशात होणारी व्हाईट-बॉल मालिका २०२६ पर्यंत पुढे ढकलली आहे. ही मालिका केवळ तेव्हाच होईल, जेव्हा बांगलादेशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेत असेल, अशी अट बीसीसीआयने घातली आहे. या सामन्याकडे केवळ क्रीडाप्रेमींचेच नव्हे, तर राजकीय विश्लेषकांचेही लक्ष लागले आहे. मैदानावरील लढत आणि मैदानाबाहेरील तणाव यामुळे हा सामना चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – IND U19 vs AUS U19 : भारत अंडर-19 संघाचा धमाकेदार विजय, ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मालिकेत घेतली अभेद्य आघाडी
भारत (प्लेइंग इलेव्हन) : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन) : सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, झाकेर अली (कर्णधार/यष्टिरक्षक), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान





