IND vs BAN : अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये रचला इतिहास, युवराज-रोहितला टाकले मागे!

IND vs BAN Abhishek Sharma fifty : आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात भारतीय संघाने अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर बांगलादेशविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली. त्यामुळे भारताने बांगलादेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य देण्यात यश आला. या सामन्यात ३७ चेंडूंमध्ये ७५ धावांची विस्फोटक खेळी साधली. ज्यामध्ये त्याने ५ षटकार आणि ६ चौकार मारले, तर स्ट्राईक रेट २०२.७० इतका गगनभेदी होता. या खेळीच्या जोरावर त्याने युवराज सिंग, रोहित शर्मा आणि केएल याचे विक्रम मोडले.
अभिषेक शर्माची हुकली शतकाची संधी –
या सामन्यात अभिषेक शर्माला शतकाची संधी होती, पण रिशाद हुसैनच्या अप्रतिम फिल्डिंगमुळे तो रन आउट झाला. पहिल्यांदाच आशिया कप खेळणाऱ्या अभिषेकने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. अभिषेक शर्माने या सामन्यात २५ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीयांमध्ये त्याने आता सर्वाधिक पाच वेळा अर्धशतक झळकावून या यादीत स्थान मिळवले.
अभिषेक शर्माने मोडले अनेक विक्रम –
Abhishek Sharma’s blistering knock comes to an end on 75 runs.
Well played, young lad!
Live – https://t.co/2CvdQIp2qu #INDvBAN #AsiaCup2025 #Super4 pic.twitter.com/dNKLVOWHVO
— BCCI (@BCCI) September 24, 2025
यापूर्वी युवराज सिंगने आपल्या टी-२० करिअरमध्ये फक्त चार वेळा हा पराक्रम केला होता. म्हणजेच, शिष्याने गुरूला मागे टाकले! या बाबतीत सर्वाधिक सात अर्धशतके सूर्यकुमार यादव यांच्या नावावर आहेत. २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने टी-२० अर्धशतक किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये अभिषेक शर्माने रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांच्यापेक्षा सरस ठरले. त्याने पाच वेळा हा विक्रम रचला असून, गुरू युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत सूर्यकुमार यादव १० अशा षटकारप्रधान डावांसह अव्वल स्थानावर आहेत.
हेही वाचा – Prasidh Krishna : भारतीय संघाला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूच्या डोक्याला झाली गंभीर दुखापत
पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्माचा एकट्याचा दबदबा –
आशिया कप २०२५ मध्ये अभिषेक शर्माने पॉवरप्लेतील १२ षटकारांचा विक्रम केला, जो श्रीलंकेच्या संपूर्ण संघाच्या सारखाच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशने प्रत्येकी ७ षटकार मारले, तर अफगाणिस्तान, यूएई आणि ओमानने २-२ षटकार केले. हाँगकाँगने केवळ एकच षटकार मारला. अभिषेकची ही आक्रमक खेळी भारतीय संघाला मजबूत पाया देणारा ठरला.





