Ind vs Ban 1st Test : चेन्नई कसोटीत बुमराहची कमाल, 4 विकेटसह आणखी एका विक्रमाला घातली गवसणी…

India vs Bangladesh 1st Test (Jasprit Bumrah) : जसप्रीत बुमराहने भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली आहे. या सामन्यात बुमराहने 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह 400 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो भारताचा 10वा गोलंदाज ठरला आहे. हसन महमूदला बाद करताच त्याने या विक्रमला गवसणी घातली आहे. बुमराहने भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. यासोबतच त्याचा विशेष यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बुमराहनं चेन्नई कसोटीत बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या डावात 11 षटकांत 50 धावा देताना 4 बळी घेतले आहेत.
यासह बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 227 डावात आतापर्यंत (चेन्नई कसोटी) 401 बळी घेतले आहेत. बुमराहने कसोटीत 163 विकेट, वनडेत 149 विकेट, तर टी20 क्रिकेटमधये 89 विकेट घेतल्या आहेत. बुमराहची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात 19 धावांत 6 विकेट्स घेणे होय.
𝟒𝟎𝟎 𝐰𝐢𝐜𝐤𝐞𝐭𝐬 𝐟𝐨𝐫 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 💥💥
A milestone to savour! @Jaspritbumrah93 has picked up his 400th wicket for #TeamIndia.
Hasan Mahmud is caught in the slips and Bangladesh are now 112-8.#INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HwzUaAMOBt
— BCCI (@BCCI) September 20, 2024
बुमराहने मोडला भज्जीचा विक्रम…
बुमराहने हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. भारतासाठी सर्वात कमी डावात 400 बळी घेण्याच्या बाबतीत त्याने भज्जीला मागे सोडले आहे. बुमराहने 227 डावात ही कामगिरी केली आहे. तर हरभजनने 237 डावात ही कामगिरी केली होती. या यादीत रविचंद्रन अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 216 डावात 400 बळी घेतले होते. तर कपिल देव यांनी 220 डावात 400 बळी पूर्ण केले होते.
वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या क्रमांकावर…
टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या स्थानावर आहे. या यादीत कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याने 687 विकेट घेतल्या आहेत. झहीर खान 610 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 551 विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद शमी 448 आणि इशांत शर्मा 434 विकेटसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे.





