Ranji Trophy 2025 : अवघ्या १८ धावांवर निम्मा संघ गारद… एकाच गोलंदाजाने पाडला फडशा! जाणून घ्या कोण आहे?

इशान किशनचे शानदार शतक –
झारखंडने कर्णधार इशान किशनच्या 173 धावांच्या खणखणीत खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 419 धावा केल्या. पांडे आणि राज या युवा जोडीने एकत्रितपणे 9 विकेट घेत तामिळनाडूचा पहिला डाव 93 धावांत गुंडाळला. यामुळे झारखंडला 326 धावांची मोठी आघाडी मिळाली आणि त्यांनी यजमानांना फॉलोऑन दिला. दिवसअखेर तामिळनाडू 274 धावांनी पिछाडीवर होता. जगन्नाथन हेमचूडेशन आणि सी. आंद्रे सिद्धार्थ प्रत्येकी 3 धावांवर नाबाद होते.
तामिळनाडूची अवस्था तिसऱ्या दिवशीही बिकट –
तामिळनाडूने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 5 बाद 18 धावांवरून केली आणि 75 धावा जोडत 93 धावांत डाव गमावला. भारताचा अंडर-19 खेळाडू आर.एस. अंबरीशने 44 चेंडूत 28 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. हेमचूडेशन (14) आणि गुरजपनीत सिंग (12) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
इतर सामन्यांचा आढावा –
बंगळुरूत झालेल्या गटातील दुसऱ्या सामन्यात विदर्भने नागालँडचा एक डाव आणि 179 धावांनी पराभव केला. विदर्भच्या 463 धावांच्या प्रत्युत्तरात नागालँडचे दोन्ही 171 आणि 113 धावांत आटोपले. कानपूर येथे आंध्रच्या पहिल्या डावातील 470 धावांच्या प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशने आर्यन जुयाल (66), रिकूं सिंग (82) आणि माधव कौशिक (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिवसअखेर 6 बाद 294 धावा केल्या, तरीही ते 176 धावांनी पिछाडीवर आहेत.
कटक येथे ओडिशाच्या 271 धावांच्या प्रत्युत्तरात बडोद्याने 7 बाद 413 धावा करत 142 धावांची आघाडी घेतली. बडोद्यासाठी शिवालिक (124) आणि मितेश पटेल (100) यांनी शतके, तर सुकीर्त पांडे (71) याने अर्धशतक ठोकले. सामन्याचा तिसरा दिवस अत्यंत रंगतदार ठरला आता पुढील काही दिवसांत आणखी रोमांचक क्रिकेटची अपेक्षा आहे.





