SL W vs SA W : धक्कादायक! धाव घेताना खतरनाक थ्रोमुळे फलंदाज जखमी, स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले, पाहा VIDEO

Vishmi Gunaratne injured in SL W vs SA W match : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मधील 18व्या सामन्यात कोलंबो येथे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहे. या सामन्यात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, 12 षटकांच्या खेळानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेची सलामीवीर फलंदाज विश्मी गुणरत्नेला गंभीर दुखापत झाल्याने खळबळ उडाली.
विश्मी गुणरत्नेला कशी झाली दुखापत?
सामन्याच्या पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझॅन कॅपने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर विश्मी गुणरत्ने हिने मिड-ऑनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी क्षेत्ररक्षकाने रनआऊट करण्याच्या प्रयत्नात केलेला थ्रो यष्ट्यांऐवजी थेट विश्मीच्या डाव्या गुडघ्यावर जाऊन लागला. यामुळे ती वेदनेने मैदानावर कोसळली. ज्यामुळे तिला तातडीने स्ट्रेचरद्वारे मैदानाबाहेर नेण्यात आले. दुखापत होण्यापूर्वी विश्मीने 16 चेंडूंत 12 धावा केल्या होत्या.
View this post on Instagram
श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून दुखापतीबाबत अपडेट –
Not a good sight in Colombo 😔
Vishmi Gunaratne is stretchered off after being struck on the inner knee while batting confidently. Wishing her a speedy recovery 🙏 Hasini Perera walks in as the new batter for Sri Lanka.🏏#CWC25 #SLvsSA #VishmiGunaratne pic.twitter.com/IMaN7g0AYU— WomenCricket.com (@WomenCricketHQ) October 17, 2025
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर विश्मी गुणरत्नेच्या दुखापतीबाबत अपडेट दिले. बोर्डाने स्पष्ट केले की, धाव घेण्याच्या प्रयत्नात चेंडू विश्मीच्या डाव्या गुडघ्यावर लागला. सध्या ती वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून, तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. संघ व्यवस्थापनाने पुष्टी केली आहे की, विश्मी पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतील.
दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी –
आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये श्रीलंका संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी दोन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले. सध्या श्रीलंका संघ 2 गुणांसह गुणतक्त्यात सातव्या स्थानावर असून, त्यांचा नेट रनरेट -1.526 आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघाने चार पैकी तीन सामने जिंकले असून, एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आजचा सामना पावसामुळे थांबला असला तरी, विश्मी यांच्या पुनरागमनामुळे श्रीलंका संघाला दिलासा मिळाला आहे. सामन्याच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





